Breaking News

नगरच्या संध्याताई सोनवणे यांची राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पुणे विभाग अध्यक्षपदी नियुक्ती !

नगरच्या संध्याताई सोनवणे यांची राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पुणे विभाग अध्यक्षपदी नियुक्ती !
अहमदनगर/प्रतिनिधी : 
       राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष हा नेहमीच सामान्य कार्यकत्याला न्याय देत असतो. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या माध्यमातून नव नेतृत्व उभे करण्यासाठी पवार साहेबांच्या माध्यमातून युवक-युवतींना मोठी संधी दिली जाते  अशाच एक आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालूक्यातील सामान्य युवतीच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठीनी संध्या ताई सोनवणे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेस पुणे विभाग अध्यक्ष पदी  नियुक्ती केली आहे .या पदाच्या माध्यमातून  महिला, आणि विद्यार्थिनांना न्या व हक्क मिळवून देण्यासाठी संध्याताई सोनवणे नक्कीच आपल्या अनुभवातून उपयोग करतील यांत शंका नाही संध्याताई सोनवणे यांनी अतिशय कमी वयात एवढी मोठी जबाबदारीचे इंद्रधनुष्य आपल्या खांद्यावर घेतले आहे त्यांची राजकीय कारकीर्दीत बघत त्या व्याख्याही १९ व्या वर्षी फर्ग्युसन काॅलेजच्या विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपल्या कामांची सुरूवात केली होती त्यानंतर २० व्या वर्षी अहमदनगर युवती जिल्हाध्यक्ष पद भूषविले. लगेचच म्हणजे वयाच्या अवध्या २२ व्या वर्षी राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसच्या पुणे विभाग अध्यक्षपदी त्यांची निवड झाली यामुळे कमी वयात एवढ्या मोठ्या जबाबदाव्या लिलया निभावणार्या संध्या ताई सोनवणे यांच्या पुढील कार्यास सर्व तरूणाई व विद्यार्थी प्रतिनिधी कडून ताई ला मन:पूर्वक शुभेच्छा असे  अहमदनगर राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसचे  जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद संजय कर्नावट यांनी  दैनिक लोकमंथन शी बोलताना सांगितले !