Breaking News

लोकनेते गोपिनाथ मुंडे ऊसतोड संघटना शिष्टमंडळाची पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा

लोकनेते गोपिनाथ मुंडे ऊसतोड संघटना शिष्टमंडळाची पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा 
----------
 ऊसतोड मजुरी दुपटीने १५० % दर  मिळावा यासाठी राज्यभर आंदोलन उभारणार 
------------
खरवंडी कासार प्रतिनिधी :
      लोकनेते गोपिनाथ मुंडे ऊसतोड कामगार संघटनेचे पाथर्डी तालुक्यातील शिष्टमंडळ मुंबई येथे पंकजा मुंडे यांच्याकडे ऊसतोड मजुरी  प्रश्नावर चर्चा करण्यासाठी गेले होते यामधे माजी मंञी आमदार सुरेश धस माजी आमदार केशवराव आंधळे पाथर्डी भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय किर्तने ऊसतोड मजुर संघटनेचे तालुकाध्यक्ष पिराजी किर्तने महादेव किर्तने संतराम दराडे आदी मान्यवर उपस्थित होते प्रत्येक वर्षी गळीत हंगाम जवळ आला की मराठवाड्यातील बीड व पश्चीम महाराष्टातील अहमदनगर जिल्ह्यातील बहुसंख्येने ऊसतोड मजुर साखर कारखान्यांवर ऊसतोडण्यासाठी जात असतो बीड आणि पाथर्डी येथील लोकनेते गोपिनाथ मुंडे ऊसतोड कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने साखर कारखान्याच्या आगामी गळीत हंगामातील ऊसतोड कामगारांना ऊसतोड मजुरी दुपटीने दरवाढ १५० %  देण्यासंदर्भात पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा केली महाराष्टातील ऊसतोड मजुर कामगार लोकनेते गोपिनाथ मुंडे यांना माननारा असल्याने लोकनेते गोपिनाथ मुंडे ऊसतोड कामगार संघटना ऊसतोड मजुरांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे आगामी गळीत हंगामात साखर कारखानदारांनी ऊसतोड मजुरांच्या मजुरीत वाढ द्यावी तसेच माजी ग्रामविकास मंञी पंकजा मुंडे यांनी साखर लवादावर शरद पवार जयंत पाटील हर्षवर्धन पाटील असल्याने त्यांच्याशी चर्चा करुन ऊसतोड मजुरांना एकशे पन्नास टक्के दरवाढ देण्यासाठी प्रयत्न करावेत असाही ठराव मांडण्यात आला पाथर्डी तालुक्यातील लोकनेते गोपिनाथ मुंडे ऊसतोड कामगार संघटना महाराष्टातील साखर कारखानदारांविरोधात ऊसतोड मजुरी वाढ प्रश्नावर माजी मंञी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व आमदार मोनिका राजळे मार्गदर्शनाखाली महाराष्टात आंदोलन पुकारेल असा इशारा लोकनेते गोपिनाथ मुंडे ऊसतोड कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने दिल्याने येणारा गळीत हंगाम तथा साखर उद्योग अडचणीत येण्याची शक्यता आहे 

    साखर कारखाने सद्यस्थितला ऊसतोडणी यंञाला प्रतिटन ४०० रुपये भाव देत आहे आणि ऊसतोड मजुर बैलगाडी धारकांना २४० रुपये प्रतिटन भाव देत आहे यामुळे ऊसतोड मजुरांना दुप्पट मजुरी देण्यात यावी.
--------- 
 - संजय किर्तने ताउपाध्यक्ष भाजपा पाथर्डी