Breaking News

राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना एका बबड्याच्या हट्टापायी नाहक मानसिक त्रास - आ आशिष शेलार

ashish shelar: Ashish Shelar मुंबईत झाडांचा कत्तलखाना सुरू आहे, त्याचे  काय?; आदित्य यांना शेलार यांचा बोचरा सवाल - tree cutting in mumbai ashish  shelar targets aditya thackeray ...

 मुंबई : विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. परीक्षांसंदर्भात यूजीसीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे. यूजीसीच्या 6 जुलैच्या गाईडलाईन्सनुसार 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यास सांगितलं होतं. ही तारीख राज्य सरकार पुढं ढकलू शकते, असं कोर्टानं म्हटलं आहे.

30 सप्टेबरपर्यंत परीक्षा घेऊ न शकणाऱ्या राज्यांनी परीक्षेची तारीख पुढं ढकलण्यासाठी यूजीसीशी संपर्क करावा, असं कोर्टानं म्हटलंय. एखाद्या राज्याला जर परीक्षा घ्यायची नसेल तर त्यांनी यूजीसीशी चर्चा करावी असंही कोर्टानं म्हटलं आहे.

न्यायमूर्ती अशोक बूषण, आर सुभाष रेड्डी आणि एम आर शाह यांच्या खंडपीठाने आज निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने निकाल देताना यूजीसीच्या अधिकारांवर शिक्कामोर्तब केलं आहे. जर एखाद्या राज्याने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांना युजीसीकडे दाद मागण्याचा पर्याय असून ते तारीख पुढे ढकलण्याची मागणी करु शकतात असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी अप्रत्यक्षरित्या मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष केलं आहे. याबाबत ट्विट करताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, "एका "बबड्याच्या" हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला.त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला.आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार.! ऐकतो कोण?.मा. सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला!