Breaking News

संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी साजरी.

संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी साजरी.
टाकळी ढोकेश्वर :
     पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर या ठिकाणी संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी चा कार्यक्रम पार पडला.  कोरोनाच्या संकटात अल्प प्रमाणात समाज बांधव पुण्यतिथी च्या कार्यक्रमासाठी  उपस्थित  होते. समाज बांधवांच्या वतीने संत सेना महाराज यांना अभिवादन करण्यात आले व पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
    या कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक बबन आतकर, गोरक्ष शिंदे सर, अहमदनगर सलुन व पार्लर असोसिएशनचे  जिल्हाध्यक्ष संदिप खंडाळे, बारा बलुतेदार संघटनेचे तालुकाध्यक्ष मनोहर राऊत, नाभिक संघटनेचे कार्याध्यक्ष नवनाथ राऊत, महाराष्ट्र सलून व पार्लर असोसिएशनचे तालुका अध्यक्ष गणेश खंडाळे,  पारनेर तालुका संघटक प्रवीण राऊत, दादा खंडाळे, आत्माराम खंडाळे, स्वप्नील राऊत तसेच नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊ बिडे, श्याम साळुंके, विनायक कुटे, सुनिल आतकर, प्रसाद भोसले, मुरलीधर आतकर,भाऊसाहेब सोनवणे, धनंजय सोनवणे, संजय वाघचौरे,आदी नाभिक समाज बांधव या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थीत होते. सर्व समाज बांधवांना पुण्यतिथीच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.