Breaking News

कोरोना रुग्णाच्या मागे नगरपालिकेस १ लाख ५० हजाराचा निधी ही निव्वळ अफवा- मुख्याधिकारी !

कोरोना रुग्णाच्या मागे नगरपालिकेस १ लाख ५० हजाराचा निधी ही निव्वळ अफवा- मुख्याधिकारी
करंजी प्रतिनिधी- 
    गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरात एक अफवा पासरली आहे की कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर एका रुग्णा मागे नागरपालिकेस दीड लाख रुपये मिळतात त्या मुळे शहरातील कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ करण्यात येत आहे अशी चर्चा शहरासह तालुक्यात जोर धरू लागली असल्याने ही निव्वळ अफवा असून असा कोणताही निधी नगरपालिकेस मिळत नाही असा खुलासा कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केला आहे.
   यात त्यांनी सांगितले की कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते  की दिनांक  २२ मार्च २०२० पासून कोविड-१९ या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असताना कोपरगाव नगरपरिषद, तहसील कार्यालय, शहर व ग्रामीण पोलीस कर्मचारी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय या सर्व प्रशासकीय यंत्रणेमार्फत कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. 
त्यामध्ये वेळोवेळी सॅनिटायझर फवारणी, घरोघरी आरोग्य तपासणी, बाधित रुग्णांना योग्य उपचार, बाधित रुग्ण आढळून आलेल्या भागात कन्टेनमेंट झोन करणे, कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना विविध सेवा सुविधा पुरवणे,  कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे या सर्व बाबी काळजीपूर्वक राबविण्यात येत आहे.
      परंतु मागील काही दिवसापासून  शहरा मध्ये एक अफवा पसरली आहे की कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यास त्यामागे नगरपालिकेला प्रत्येक रुग्णामागे दीड लाख रुपये  अनुदान मिळत  होत आहे तरी
सर्व नागरिकांना आवर्जून सांगावे वाटते की, आमचे नगरपरिषदेचे कर्मचारी अहोरात्र कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न करत आहे. त्यापैकी जे कर्मचारी कोविड केअर सेंटरला कार्यरत आहेत ते मागील दीड महिन्यापासून कोपरगांव शहरात त्यांचे घर असून देखील त्यांच्या घरच्यांना भेटले नाहीत. ते अहोरात्र रुग्णसेवा करत असताना त्यांच्यामुळे समाजातील लहान, वयोवृद्ध नागरिक यांना त्यांच्यापासून बाधा होऊ नये या हेतूने कोविड सेंटरला सेवा दिल्यानंतर प्रशासनाने व्यवस्था केलेल्या हॉटेलमध्ये राहत आहे.
मार्च २०२० पासून  कोरोना बाधित रुग्णांमागे कोणताही निधी नगरपरिषदेला मिळालेला नाही. 
     तसेच  भविष्यात देखील निधी मिळेल याबाबत शासन स्तरावर कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना आवाहन करतो की, समाज माध्यमातून पसरणाऱ्या अशा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये.
 प्रशासनाने दिल्या सूचनांचे पालन करावे. प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडताना नियमित मास्क वापरावा,  सॅनिटायझरचा नियमित वापर करावा व सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे या त्रिसूत्रीचा आपल्या दररोजच्या जीवनात अवलंब करत जीवनावश्यक गोष्टीमध्ये यांचा समावेश करत प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच राज्य शासनाने व कोपरगाव प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करत वाढती कोरोना साखळी खंडित करण्यासाठी सहकार्य करावे असे आव्हान मुख्याधिकारी यांनी केले आहे.