Breaking News

जामखेड पाच दिवस बंद, बंदला अनेक व्यापारयांचा विरोध तर व्यापारयांच्याच बैठकीत निर्णय : प्रशासन

जामखेड पाच दिवस बंद, बंदला अनेक व्यापारयांचा विरोध तर व्यापारयांच्याच बैठकीत निर्णय : प्रशासन
  जामखेड प्रतिनिधी :
      सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असून बाधितांची संख्या जामखेडला मोठ्या प्रमाणावर वाढतांना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने व्यापारयांबरोबर बैठक घेऊन दि ८ ते १२ आँगस्ट पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार पाच दिवस जामखेड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 
       तहसिलदार विशाल नाईकवाडे मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील नायब तहसीलदार नवनाथ लांडगे व्यापारी व काही नागरिक उपस्थित होते. पाच दिवसांच्या या बंदला अनेक व्यापारयांचा विरोध आहे मात्र व्यापारयांच्याच सांगण्यावरून बंद चा निर्णय घेतला असल्याचे प्रशासनाने सांगितले. 
     यावेळी उपस्थित व्यापारयांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. हा बंद लादला जात आहे तर काही व्यापारयांनी कोरोना प्रसार रोखण्यासाठी शहर बंद ठेवणे गरजेचे आहे असे सांगितले. 
    यावेळी रोटरी क्लबचे विनायक राऊत यांनी सांगितले की जामखेडच्या शेजारी आष्टी, पाटोदा, भुम, करमाळा, कर्जत आदी तालूके कोरोनामूळे बंद आहेत.तेथील लोक खरेदीसाठी जामखेडला येतात त्यामुळे मोठी गर्दी होत असल्याने कोरोना प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. 
    यावेळी सुनील जगताप यांनी सांगितले की बंद काळात सर्व व्यापारयांनी व नागरिकांनी स्वतःला होमकाँरान्टाईन करून घेतले पाहिजे. दूकानं बंद अन् नागरिक रस्त्यावर फिरतांना दिसु नये. 
     अहमदनगर सारख्या मोठ्या शहरात कोरोनाचे पेशंट वाढत असुनही तेथे लाँकडाऊन नाही. जामखेड बंद करणे कोरोना रोखण्याचा उपाय होऊ शकत नाही असे सांगत राहूल उगले, शरद शिंगवी, अमृत कोठारी आदी व्यापारयांनी बंदला विरोध दर्शविला. यावेळी प्रा मधूकर राळेभात, विठ्ठल राऊत, कटारिया आदी मोजक्या लोकांनी मत मांडले. 
   नेहमीप्रमाणे प्रशासनाने बैठकीला ठराविक व्यापारयांनाच बोलावले राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावले नाही  ते चार पाच लोक जे नेहमी प्रमाणे उपस्थित राहून मत मांडतात ते समस्त शहरवासियांचे मत होऊ शकत नाही त्यामुळे झालेला निर्णय हा सर्वानुमते नाही असे मनसे तालुकाध्यक्ष प्रदिप टापरे यांनी सांगितले.
    संभाजी ब्रिगेडचे आण्णासाहेब सावंत यांनी जामखेड बंदला विरोध दर्शविला आहे. कोरोना रुग्ण वाढीचे कारणं वेगळे आहेत. बंद म्हणजे सामान्य माणसाला उपाशी पोटी मारण्याचा प्रकार आहे. मुठभर लोकांच्या सांगण्यावरून गाव बंद ठेवण योग्य नाही आम्ही याला विरोध करणार असल्याचे आण्णासाहेब सावंत यांनी सांगितले.