Breaking News

गुरुमाऊलीच्या दोन्ही शाखा एकाच माळेच्या मणी - डॉ.संजय कळमकर !

गुरुमाऊलीच्या दोन्ही शाखा एकाच माळेच्या मणी -डॉ.संजय कळमकर !
-----------------
कोपरगाव तालुका शिक्षक समिती अध्यक्षपदी दत्तात्रय गरुड तर गुरुकुल च्या अध्यक्षपदी संजय खरात !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
   शिक्षक बँकेमध्ये   रावसाहेब रोहोकले व बापू तांबे या दोन्ही गटाचे संचालक आहेत.घड्याळाच्या भ्रष्टाचारामध्ये दोन्ही गटाचे संचालक समाविष्ट आहेत.बँकेतील कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगाचा काढलेला फरक सर्वच संचालकांनी वाटून घेतला असे असताना रोहोकले गट स्वतःला स्वच्छ म्हणवून घेण्यात गर्क आहे.परंतु,गुरुकुल दोन्ही गटाचे पितळ उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही, गुरुमाऊली मंडळाच्या या दोन्ही शाखा म्हणजे एकाच माळेचे मणी आहेत.असा आरोप शिक्षक नेते डॉ.संजय कळमकर  यांनी केला आहे.
        कोपरगाव तालुका प्राथमिक शिक्षक समिती व तालुका गुरुकुल मंडळाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी कोपरगाव तालुका गुरुकुल मंडळ शिक्षक समिती ,गुरुकुल महिला आघाडी ,गुरुकुल उच्चाधिकार समिती,कोपरगाव तालुका गुरुकुल dcps संघटना, नगरपालिका आघाडी यांसह विविध कार्यकारण्या  निवडण्यात आल्या.
        यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संजय धामणे म्हणाले कि बँकेच्या संचालकांनी सभासदांच्या भावनांचा विचार करून कर्जाचा व्याजदर एक टक्का कमी करावा बँकेत अनेक वर्ष भ्रष्टाचार केल्याने अस्तित्वहीन झालेल्या सदिच्छा मंडळाची आम्हाला मुळीच भीती नाही.आता जिल्ह्याला गुरुकुल शिवाय पर्याय नाही.
           कोपरगाव तालुका शिक्षक समिती गुरुकुल मंडळाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात मार्गदर्शक म्हणून शिक्षक नेते डॉ.संजय कळमकर,शिक्षक समितीचे संजय धामणे,गुरुकुल मंडळ उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष नितीन काकडे,गुरुकुल मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन शिंदे शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय नळे ,गुरुकुल मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुखदेव मोहिते शिक्षक समिती गुरुकुल मंडळाचे जिल्हा संपर्कप्रमुख अशोक कानडे, जिल्हा कोषाध्यक्ष श्रीराम तांबे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सीताराम गव्हाणे, आप्पासाहेब चौधरी,प्रमोद जगताप,बाळासाहेब घाडगे,संभाजी गोसावी,पांडुरंग पटारे,रवींद्र धाकतोडे आदि उपस्थित होते.यावेळी गुरुकुल व समितीच्या विविध आघाड्यांच्या निवडी पुढीलप्रमाणे करण्यात आल्या.शिक्षक समिती-अध्यक्ष दत्तात्रय गरुड, सरचिटणीस लक्ष्मीकांत वाडीले,कार्याध्यक्ष नंदकुमार दिघे,कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर सैंदाणे,जिल्हा प्रतिनिधी नानासाहेब पंडित.तालुका गुरुकुल मंडळ-अध्यक्ष संजय खरात,सरचिटणीस वाल्मिक निळकंठ ,कार्याध्यक्ष गणेश पाचोरे,कोषाध्यक्ष सिद्धांत भागवत.गुरुकुल मंडळ उच्चाधिकार समिती –अध्यक्ष संजय महानुभाव,सरचिटणीस आप्पासाहेब चौधरी,कार्याध्यक्ष कैलास वाघ,कोषाध्यक्ष तुळशीराम वसईकर.कोपरगाव तालुका गुरुकुल मंडळ महिला आघाडी –अध्यक्ष श्रीमती.सुनिता मोरे,सरचिटणीस श्रीमती सविता जमधडे,कार्याध्यक्ष श्रीमती अलका जाधव, कोषाध्यक्ष श्रीमती सुलोचना कुळधरण,शिक्षक समिती कोपरगाव नगरपालिका- अध्यक्ष मुबश्शीर खान, सरचिटणीस श्रीमती मंगल बिबवे ,कार्याध्यक्ष श्रीमती साखरबाई रणछोड कोषाध्यक्ष श्रीमती रजनी खैरनार .
कोपरगाव नगरपालिका गुरुकुल मंडळ –अध्यक्ष प्रताप वळवी,सरचिटणीस श्रीमती सरस्वती कानडे,कार्याध्यक्ष नसरीन इनामदार ,कोषाध्यक्ष प्रतिभा केने.कोपरगाव तालुका गुरुकुल डिसीपीएस संघटना – अध्यक्ष लतीफखान पठाण,सरचिटणीस श्रीकांत साळवे,कार्याध्यक्ष सुनील सोनोने, कोषाध्यक्ष अंकुश चव्हाण,कार्यालयीन चिटणीस भाग्यश्री गिरी,उपाध्यक्ष युसुफ खेतीवाले,रामदास कदम,संघटक निळे सोनाली ,सल्लागार गणेश आतकरे, धनंजय सूर्यवंशी.कोपरगाव तालुका गुरुकुल तंत्र स्नेही मंडळ-अध्यक्ष महेंद्र गोसावी,सरचिटणीस संतोष थोरात,कार्याध्यक्ष मच्छिंद्र खैरे,सहकार्याध्यक्ष अशोक शिरसाठ,कोषाध्यक्ष अनुजकुमार ढुमणे यांची निवड करण्यात आली.
       सदर त्रैवार्षिक अधिवेशन प्रसंगी अशोक थोरात,कैलास  ,नवनाथ सूर्यवंशी,विक्रम पवार,कैलास दाते,महेंद्र निकम,शोभा गाडेकर,राहुल वायखींडे,राहुल भागवत,शबनम खान,कैलास सोमासे,अनिल झाल्टे,जयंत मोरे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक कानडे यांनी केले तर शेवटी आभार श्रीराम तांबे यांनी मानले