Breaking News

पारनेर शहरांमध्ये वाढतोय कोरोनाचा धोका, मटण विक्रेत्यांच्या कुटुंबात ५ व्यक्तींना कोरोना !

पारनेर शहरांमध्ये वाढतोय कोरोनाचा धोका, मटण विक्रेत्यांच्या कुटुंबात ५ व्यक्तींना कोरोना !
-----------
सध्या पारनेर शहरातील तेरा व्यक्ती घेत आहेत कोरोनाचे उपचार
------------------
पारनेर शहरातील कंटेनमेंट झोन चे काटेकोरपणे पालन करण्याचे मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांना तहसिलदार यांचे निर्देश
------------------
जातेगाव येथील कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्याचा कोरोना चाचणीस नकार, पोलिस निरीक्षकांना कारवाई निर्देश 
पारनेर प्रतिनिधी -
       पारनेर शहरातील मटण विक्रेत्या पाठोपाठ कुटुंबातील ५ सदस्यांना कोरोना ची लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या संबंधित मटण विक्रेत्या कडून ज्या व्यक्तींनी मटन नेले असेल त्यांनी व लक्षणे आढळत असतील त्यांनी त्वरित पारनेर येथील लेडीज होस्टेल येथील कोरोना सेंटरमध्ये जाऊन आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व कंटेनमेंट झोन चा १०० मीटर चा परीघ पूर्णपणे काटेकोर बंद ठेवण्याचे मुख्य अधिकारी व पोलिस निरीक्षक यांना निर्देश तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.
      पारनेर तालुक्यांमध्ये कोरोना बाधित आकडा ४०० च्या जवळपास आहे. तालुक्याची कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही चिंतेचा विषय होत चाललेली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालात शहरातील ७ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे तसेच एकाच कुटुंबातील ५ व्यक्ती कोरोना बाधित असल्याने शहराची चिंता वाढली आहे.
        यापूर्वीच कोरोना बाधित असलेल्या मटण विक्रेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना ची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या परिसरात कंटेनमेंट झोन आधीच जाहीर आहे. मात्र तिथे काटेकोरपणे पालन केले जात नाही. मात्र आता तिथे कडकडीत कंटेनमेंट चे पालन करणे गरजेचे आहे. तसे आदेश तहसिलदार ज्योती देवरे यांनी मुख्य अधिकारी डॉ. सुनिता कुमावत व पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना दिले आहेत.
   या परिसरातील एकही दुकान उघडू नये व घरातील एकही व्यक्ती बाहेर पडू नये याची दक्षता घ्यावी.
       पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांनी या परिसरात घरोघरी जाऊन आरोग्यसर्वेक्षण करावेत, लक्षणे आढळताच त्या व्यक्तीनी कोरोना चाचणी करून घ्यावी.
        शहरात कोरोना संख्या वाढत असल्याने कंटेन्मेंट घोषित केलेल्या परिसरामध्ये काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. त्या परिसरात नागरिकांना अत्यावश्यक वस्तू घरपोच देण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.
       दरम्यान जातेगाव येथील यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील व्यक्ती या कोरोना चाचणी करण्यास असमर्थता दर्शवित आहेत. खाजगी मध्ये चाचणी करू असे सांगत आहेत. मात्र अद्याप चाचणी केली नाही याबाबत गटविकास अधिकारी किशोर माने यांना सूचना केल्या आहेत. तसेच पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना गुन्हे दाखल करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.

    शहरातील नागरिकांनी आता काळजी घेणे गरजेचे आहे कोरोना चा संसर्ग वाढत असल्याने प्रत्येकाने अनावश्यक गर्दी टाळणे गरजेचे आहे गरज असेल तरच बाहेर पडणे गरजेचे आहे मात्र तसे शहरात होताना दिसत नाही अनेक ठिकाणी लोक मोठी गर्दी करताना दिसून येत आहेत त्यामुळे कोरोना चा धोका वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे यासाठी प्रत्येकाने स्वतः जबाबदारीने वागले तरच कोरोनाला आळा बसू शकतो.
----------------
ज्योती देवरे 
तहसीलदार पारनेर