Breaking News

मानवाधिकार संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल गुलदगड यांचा सत्कार !

मानवाधिकार संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल गुलदगड यांचा सत्कार !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
     अँटी करप्शन अधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली दिलीप कुराडे नवी दिल्ली यांच्या उपस्थितीमध्ये  संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष .सचिन  गुलदगड यांची मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा अहमदनगर येथे अँटी करप्शन अधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली  दिलीप कुराडे यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला. 
       यावेळी  अ़ंदरसुल कृषी उत्पन्न उपबाजार समितीचे सभापती मकरंद  सोनवणे,श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य अहमदनगर ऊत्तर जिल्हा अध्यक्ष.मुकुंद मामा काळे,संवत्सर येथील  प्रगतशील शेतकरी रमेश ससाणे,अंदरसुलचे चंद्रकांत  सोनवणे  गणेशजी गायकवाड आदी उपस्थित होते.
सदर प्रसंगी मकरंद सोनवणे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना सामाजिक कार्यात आपले असलेले योगदान निच्छितच इतरांसाठी प्रेरणादायी असुन यापुढेही आपला वेगळा ठसा उमटवतील असा आशावाद व्यक्त करत शुभेच्छा दील्या तर मुकुंद मामा काळे यांनी सर्व पदाधिकारी यांनी सर्वांना असेच एकोप्याने पुढे घेऊन जाऊन सर्व जनसामान्यांना मदत होत रहावी व उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करत रहावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
 श्री संत सावता माळी युवक संघ तालुका अध्यक्ष अशोक  माळवदे,शहर प्रमुख शेखर बोरावके,संतोष रांधव,डाॅ.मनोज भुजबळ,योगेश ससाणे,संदीप डोखे,मनोज चोपडे,अनंत वाकचौरे,धोत्रे पोलिस पाटील देवेश माळवदे,सुनिल मंडलिक आदींनी नुतन पदाधिका-यांच्या निवडी बद्दल समाधान व्यक्त केले.