Breaking News

नेवासा तालूक्यात शुक्रवारी नव्याने ३२ रुग्णांची वाढ तर २४ कोरोनामुक्त !

नेवासा तालूक्यात शुक्रवारी नव्याने ३२ रुग्णांची वाढ तर २४ कोरोनामुक्त ! 


नेवासा तालुका प्रतिनिधी :
नेवासा तालूक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव अधिकच गडद होत चालला असून शुक्रवार (दि.२१) रोजी तालूका आरोग्य अधिकारी डॉ अभिराज सुर्यवंशी यांनी माध्यमांना दिलेल्या माहीतीत नव्या ३२ रुग्णांची शुक्रवारी वाढ झाली तर २४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे सांगितल्याने तालूक्यात कोरोना या संसर्ग रोगाचा प्रादूर्भाव आटोक्यात न येता वाढतच चालल्याचे दिसून येत आहे.
  शुक्रवार (दि.२१) रोजी नव्याने ३२ रुग्णांची वाढ झालेली आहे. त्यामध्ये सोनई ०१,खडका ०१,शिंगवेतुकाई ०१,शिरेगांव ३,नेवासा बुद्रूक ०३, भेंडा खुर्द ०२, घोगरगांव २,नेवासा खुर्द ०२, गिडेगांव ०६, कुकाणा ०७, तर खुपटी येथील ४ रुग्णांची वाढ झाली आहे.
   तालूक्यात एकूण रुग्ण संख्येचा अाकडा ५७१ झाला अाहे. त्यापैकी ४४८ रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे तर १०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. १४ रुग्णांचा मृत्यु झालेला आहे. कोरोना या संसर्ग आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता जनतेनेच याची दक्षता घेणे गरजेचे आहे.तालूका आरोग्य विभाग कोरोनावर मात करण्यासाठी परिश्रम घेत असतांना जनतेने नियमाचे पालन करणे गरजेचे असल्याचेही सुज्ञ नागरीकांतून बोलले जात आहे.