Breaking News

राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना मातृशाेक !

राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना मातृशाेक !
मुंबई / प्रतिनिधी
राज्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोना परिस्थिती समर्थपणे हाताळणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदा टोपे (७४) यांचे निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्या प्रदीर्घ आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान १ ऑगस्टरोजी रात्री नऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. शारदा टोपे या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्षा होत्या. शारदा टोपे यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी ४ वाजता पार्थपूर ता. अंबड जि. जालना या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, बैठका यातून वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री आईला भेटायला रुग्णालयात जात असत. रोज सकाळी आईला भेटूनच ते दिवसाची सुरुवात करायचे. आईच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.