Breaking News

साई शक्ती चा विद्यार्थी सैनिकी प्रवेश परीक्षेत तालुक्यात प्रथम !

साई शक्ती चा विद्यार्थी सैनिकी प्रवेश परीक्षेत तालुक्यात प्रथम !


करंजी प्रतिनिधी-
     कोपरगाव तालुक्यातील साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयता सहावी मध्ये शिकत असलेला उत्कर्ष व्यवहारे हा ऑल इंडिया सैनिकी प्रवेश परीक्षेत कोपरगाव तालुक्यात प्रथम आला असून आता त्याची पुढील शिक्षणासाठी चंद्रपूर सैनिकी शाळेत निवड झाली आहे.
       कोपरगाव येथील माजी सैनिक गोविंद व्यवहारे व शांताबाई व्यवहारे यांचा नातू व वीट व्यावसायिक प्रदीप व्यवहारे यांचा तो मुलगा आहे. भारत सरकार मार्फ़त सैन्य दलात अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यासाठी पुढील शिक्षणाकरिता ऑल इंडिया सैनिकी प्रवेश परीक्षा घेतली जाते त्यात ३०० मार्क पैकी तब्बल २३५ मार्क मिळवत साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूल कासली ता कोपरगाव मध्ये इयता सहावी च्या वर्गात शिकत असलेल्या उत्कर्ष चंद्रपूर येथील सैनिकी शाळेत इयता सातवी च्या वर्गात प्रवेशास पात्र झाला असल्याने भविष्यात ग्रामिण भागातील साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूल चा विद्यार्थी भारतीय सैन्य दलात अधिकारी म्हणून पहावयास मिळेल.
    गेल्या चार वर्षांपासून उत्कर्ष अहोरात्र प्रयत्न करत होता त्याचा या यशासाठी त्याचे साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूल चे संस्थापक परशराम साबळे, सचिव सुचित्रा साबळे, प्राचार्य विजय जाधव, शिक्षक विलास चव्हाण, सोनाली कापसे यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले.