Breaking News

डॉ खराडे बदली प्रकरण : राजकीय सामाजिक संघटना उतरणार रस्त्यावर, समाजमाध्यमामधुन नागरिकांची नाराजी !

डॉ खराडे बदली प्रकरण : राजकीय सामाजिक संघटना उतरणार रस्त्यावर, समाजमाध्यमामधुन नागरिकांची नाराजी 
जामखेड प्रतिनिधी :
      वैद्यकीय अधिक्षक डॉ यूवराज खराडे यांची  अचानक चुकीच्या पद्धतीने बदली झाली असे वृत्त दैनिक लोकमंथन मधून प्रकाशित होताच नागरिकांमधून बदली विरोधात नाराजीचे सूर उमटले 
    आज दि १२ रोजी झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीतही बदली विषय चांगलाच वाजला. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कोरोना काळात गणेशोत्सव साजरा करण्याबाबत प्रशासनाचे नियम अटींची माहीती देण्यासाठी शांतता कमिटीची व गणेशोत्सव मंडळांची बैठक आयोजित केली होती. 
यावेळी बदली विरोधात अनेक राजकीय सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारयांनी नाराजी व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले. कोरोना काळातच नव्हे तर इतरही वेळी २४ तास जनतेच्या सेवेसाठी हजर असणाऱ्या, तसेच गोरगरिबांचे मोफत उपचार करणाऱ्या,डॉ.युवराज खराडेंसारख्या अधिकार्याची बदली काही कानफुक्यांनी सांगितल्यामुळे झाली असल्याचे समजते. प्रशासकीय बदली असेल तर ठिक आहे.पण कानफुक्यांमुळे जर बदली केली असेल तर निश्चितच यावर प्रशासनाने व पदाधिकाऱ्यांनी विचार करावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून लोकशाहीमार्गने आंदोलन करू असे अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा मधूकर राळेभात, 
 मनसेचे प्रदिप टापरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगेश आजबे, शिवसेनेचे नगरसेवक शामीरभाई सय्यद, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, काँग्रेसचे जमीर सय्यद, जिव्हाळाचे मौलाना खलील, लोकाधिकारचे अरूण जाधव, मुस्लिम विकास परिषदेचे शेरखान पठाण, ताहेरखान संभाजी ब्रिगेडचे अवधूत पवार आदींनी डॉ खराडे यांची चुकीच्या पद्धतीने झालेली बदली रद्द व्हावी याबाबत शांतता कमिटीच्या बैठकीत मूद्दा उपस्थित केला तसेच  बदली रद्द करण्याबाबत प्रशासनाला लेखी निवेदन लवकरच देणार आहेत.