Breaking News

वैद्यकीय उपचारासाठी धनादेश वाटप,सागर मैड यांच्या प्रयत्नांना यश !

वैद्यकीय उपचारासाठी धनादेश वाटप,सागर मैड यांच्या प्रयत्नांना यश !
 सुपा / प्रतिनिधी :
    पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील गरजू रुग्ण झुंबर एकनाथ जवक यांना भाजयुमोर्चाचे तालुका सरचिटणीस सागर मैड यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषद सेस निधीतून वैद्यकीय उपचारासाठी निधी मंजूर झाला असून सदर निधीचा धनादेश जवक यांना प्रदान करण्यात आला.
       यावेळी भाजयु मोर्चाचे तालुका सरचिटणीस सागर मैड, डॉ. पवार साहेब, बाप्पू पाटील शिंदे, सोमनाथ नांगरे, अण्णा बारवकर, दिगंबर पवार, प्रसाद पवार, माधव पठारे, मनोज सोनार, अमोल मैड आदी उपस्थित होते.  
      यावेळी सागर मैड म्हणाले की, जिल्हा परिषद सेस फंडातून हृदयविकार, किडनी व कर्करोगावरील उपचार घेण्यासाठी निधी उपलब्ध आहे. गरजू रुग्णांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून पाठ पुरावा केल्यास निधी मंजूर होण्यास मदत होते. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा फुले वैद्यकीय सहाय्यता निधी आदी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून गरजू रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही सागर मैड यांनी केले आहे.