Breaking News

तालुक्यातील १९९८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ०१ कोटी ८६ लाख रक्कम जमा - सौ.कोल्हे !

तालुक्यातील १९९८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ०१ कोटी ८६ लाख रक्कम जमा - सौ.कोल्हे !
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
       सन २०१९ -२० च्या खरीप हंगामातील कापुस व तुर या पिकाच्या विम्याची रक्कम शेतक-यांना तातडीने अदा करण्याची मागणी राज्याचे कृपीमंत्री दादा भुसे यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे तालुक्यातील १९९८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १ कोटी ८६ लाख २३ हजार ०२३.९५ रक्कम जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना  मोठा दिलासा मिळाला असल्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव सौ. स्नेहलता  बिपीनदादा कोल्हे यांनी सांगितले. 
सन २०१९ -२० मधील खरीप हंगामातील कापुस व तुर या पिकांची मोठया प्रमाणात लागवड करण्यात आलेली होती, परंतू वेळेवर पाउस पडला नाही, तसेच खराब हवामान आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मोठया प्रमाणात खर्च करून उभी केलेली हातातोंडाशी आलेली दोन्हीही पिके वाया गेली, त्यामुळे शेतक-यांना मोठया आर्थीक नुकसानीस सामोरे जावे लागले. तत्कालीन सरकारच्या माध्यमातून दोन्ही पिकांचा भारतीय कृपी विमा कंपनीमार्फत विमा उतरविण्यात आला होता, त्या विम्याची रक्कम शेतक-यांना अदा करण्याची मागणी देखील वेळोवेळी केली. सध्या जगासह देशभरात कोरोनाच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढला असून महाराष्ट्रातही या आजाराने थैमान घातले आहे. मोठया कालावधीसाठी लाॅकडाउन करण्यात आल्याने शेतक-यांपुढे मोठे आर्थीक संकट उभे राहिले, विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशा परिस्थितीत त्यांना सन २०१९-२० च्या खरीप हंगामातील कापुस व तुर  पिकाच्या विम्याची रक्कम मिळाल्यास दिलासा मिळेल, त्यामुळे सदरच्या भारतीय कृषी विमा कंपनीनीकडून तातडीने विम्याची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा करण्याची मागणीनुसार दहेगाव बोलका १ कोटी ४८ लाख ९८हजार ५३६.८६ , कोपरगाव ४ लाख ९३ हजार ७७६.९१, पोहेगाव ५ लाख ८ हजार ००५.२३, रवंदे २१ लाख ५३हजार २१२.२१ , सुरेगाव ५ लाख ६९ हजार ४९२.७४असे एकुण ०१ कोटी ८६ लाख २३ हजार ०२३.९५ रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.