Breaking News

मतिमंद मुलीवर अत्याचार नराधम आरोपीला ठोकल्या बेड्या मुलीने दिला मृत बाळाला जन्म !

मतिमंद मुलीवर  अत्याचार नराधम आरोपीला  ठोकल्या बेड्या
मुलीने दिला मृत बाळाला जन्म !
अकोले प्रतिनिधी :
अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे एका मतिमंद मुलीवर वारंवार अत्याचार    केल्याचे उघडकीस आल्याने   पोलिसांनी त्या नराधमास बेड्या ठोकल्या आहे 

मतिमंद मुलीवर अत्याचार केल्या नंतर   ती गर्भवती राहिली  असता तीने मृत मुलीस जन्म दिला आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार  अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
 पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी आरोपी  पप्पू रंगनाथ फलके (रा. ब्राम्हणवाडा  ता. अकोले) याला   अटक  केली आहे 

  अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा शिवारात एक महिला व तिची मतिमंद मुलगी अशा दोघी मायलेकी वस्तीवर राहतात   पीडित मुलीची आई शेतात गेल्यानंतर ही 32 वर्षीय तरुणी एकटीच घरात राहत होती. त्यावेळी आरोपी पप्पू तेथे येत असे व तिच्याशी गप्पा मारुन तिच्याशी शरिरीक संबंध करीत असे. गेल्या सहा ते सात   महिन्यापासून त्याने पीडितेवर अनेकदा अत्याचार केले होते. दरम्यान दोन दिवसांपुर्वी पीडित मुलीचे पोट दूखु लागल्याने तिला घारगाव येथे एका दवाखाण्यात नेण्यात आले. यावेळी ती गर्भवती  असल्याचे समजले .या दरम्यान तिला जास्त  त्रास होऊ लागल्याने   त्यांनी तिला  आळेफाटा येथील एका रुग्णालयात पाठविले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, या मुलीच्या पाटोत अर्भक असून ते मृत झाले असून  शस्र क्रिया  करण्याचा सल्ला दिला. तिच्या वर यशस्वी शस्र क्रिया केल्यानंतर तिने मृत  बाळाला जन्म दिला

दरम्यान पीडित तरुणीची च्या सांगण्यातुन  हा प्रकार आईच्या लक्षात आला. त्यानंतर तीचे थेट पोलीस ठाणे गाठले. सुरवातीस आळेफाटा पोलीस स्टेशन  स्टेशन येथून ऑनलाइन आल्याने अकोले  पोलिसांत गुन्हा रजिस्टर 318/2020  भा द वि कलम 376,451,506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे  पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे पुढील तपास करत आहे 

 अकोले पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करुन आरोपी पप्पू रंगनाथ फलके यास  ताब्यात घेतले . त्यानंतर पीडित मुलीस विचारणा केली असता यानेच हा प्रकार केल्याचे तिने सांगितले. तर आरोपी हा पीडित मुलीच्या घरापासून काही अंतरावर राहणारा आहे. त्यानेच हा प्रकार केल्याचे कबुल केले असून पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या आहे
-----