Breaking News

कोपरगाव चार दिवस बंद !

कोपरगाव चार दिवस बंद !


करंजी प्रतिनिधी-
    कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते कि, कोपरगाव शहरात कोविड-१९ कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या अनुषंगाने  ज्या भागात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे, त्या गांधीनगर, महादेवनगर, गोरोबानगर, दत्तनगर, टिळकनगर, विवेकानंद नगर, सप्तर्षीमळा,कालेमळा, सुभाषनगर, संजयनगर, समतानगर ,निवारा व सुभद्रानगर इ. भागातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची कोरोना सदृष लक्षणांची सर्वेक्षण करणेसाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.
आपल्या कुटुंबाकडे सर्वेक्षण करिता येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना सहकार्य करून अचूक माहिती देवून सहकार्य करावे. 
*याकामी दि. २८ ते ३१ ऑगस्ट २०२० या ४ दिवस सर्व अत्यावश्यक सेवासह सर्व आस्थापना १००% लॉकडाऊन राहील.* 

यादरम्यान फक्त 
◆दवाखाने व मेडिकल सुरू राहतील
◆दुध सकाळी ५ ते ८ या वेळेत
◆बँक व पतसंस्था(अत्यावश्यक काम असेल तरच बँकेत जावे)

खोकला, ताप, श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होणे इ. लक्षणे दिसल्यास उपचार घ्या.
एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असल्यास, त्यांना तपासणी करण्यास प्रोत्साहित करा.
कुटुंबातील लहान मुले व जेष्ठांची काळजी घ्या.
कोविड-१९ ची लक्षणे दिसत असलेल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र यांची माहिती त्वरित प्रशासनाला कळवा.
काळजी करू नका.. सावध रहा.. स्वतः ला इतरांना सुरक्षित ठेवा..

मास्क व सॅनिटायझर चा नियमित वापर करा.
घरी राहा.... सुरक्षित राहा.... 
प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. 
 
योगेश चंद्रे   प्रशांत सरोदे  राकेश मानगांवकर
 तहसिलदार   मुख्याधिकारी   पोलिस निरीक्षक
                 प्रशासन कोपरगांव शहर