Breaking News

तालुक्यात दोन व्यक्तीचा कोरोनामुळे मुळे मृत्यू, पारनेर तालुक्यातील ८ अहवाल पॉझिटिव्ह !

तालुक्यात दोन व्यक्तीचा कोरोनामुळे मुळे मृत्यू, पारनेर तालुक्यातील ८ अहवाल पॉझिटिव्ह !


पारनेर प्रतिनिधी -
      पारनेर तालुक्यांमध्ये आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये  ८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोन व्यक्तींचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
पारनेर २, राळेगण सिद्धी १, गुणोरे १, सुपा ३, बाबर्डी १ या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवालात समावेश आहे.
   पारनेर तालुक्यातील अस्तगाव येथील एका ५७ वर्षीय व्यक्तीचा अचानक ऑक्सीजन लेव्हल कमी झाल्यामुळे त्यास रुई येथील आरोग्य केंद्रामध्ये तपासणी केली तसेच करोना चाचणी साठी स्राव दिले मात्र त्या व्यक्तीचा दि २८ रोजी रात्री नऊ वाजता मृत्यू झाला त्यानंतर दि २९ रोजी त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव प्राप्त झाला आहे. तर दुसरा मृत्यू निघोज येथील ८० वर्षीय व्यक्तीचा झाला आहे. ही व्यक्ती नगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. हा व्यक्ती या अहवाल ६ दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता.
    यामुळे तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २१ वर गेली आहे. तर तालुक्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ७५० झाले आहेत.