Breaking News

कोपरगाव तालुक्यात २६ रुग्ण वाढले तर एकाचा मृत्यू !

कोपरगाव तालुक्यात २६ रुग्ण वाढले तर एकाचा मृत्यू
करंजी प्रतिनिधी-
      आज रक्षाबंधनच्या दिवशी कोपरगाव तालुक्यातील विविध भागात एकूण २६ कोरोना रुग्ण आढळून आले आहे तर संजीवनी परिसरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला असून आता तालुक्यातील एकूण कोरोना ने मृत्यू झालेल्याची संख्या दोन झाली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
   आज दुपारी मिळालेल्या कोरोना अहवाल माहिती नुसार एकूण ९७ रॅपिड टेस्ट केल्या असून त्यात २६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे यात  बैल बाजार रोड २, संजयनगर १ ,येसगाव १, टिळकनगर २, संजीवनी परिसर १४ ,टिळेकर वस्ती १ , द्वाराकानगर १ ,सुभद्रानगर १ ,कोळपेवाडी १ , इंदिरापथ १ , लक्ष्मीनगर  १ असे एकूण तब्बल २६ कोरोना अहवाल  पॉझिटिव्ह आले आहे 
  आज कोरोनावर यश मिळून पूर्णपणे बरे झालेले एकूण ९ रुग्ण घरी सोडले असून सध्या कोपरगाव तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या१६२ झाली असून सध्या ऍक्टिव्ह रुग्ण १०७ आहे.
     सध्या कोपरगाव तालुक्यातील परिस्थिती फार भयानक होत चाली असून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.