Breaking News

राहुरीच्या पोलिस निरीक्षकांच्या हलगर्जीपणा २१ जणाचा जीव धोक्यात !

राहुरीच्या पोलिस निरीक्षकांच्या हलगर्जीपणा २१ जणाचा जीव धोक्यात

देवळाली प्रवरा :
                 राहुरी पोलिसांनी गुरुवारी  दोन संशयीत आरोपींना अटक केली. त्यांचे कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले. त्यांचा कोरोना अहवाल येण्यापूर्वीच त्यांची रवानगी कारागृहातील कोठडीत करण्यात आली.चारजणांची क्षमता असलेल्या कोठडीत १३ जणांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह कैद्याने २४ तास काढले. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या हलगर्जीपणामुळे कोठडीतील १३ कैदी व कारागृहाचे 8 सुरक्षा पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.
                 संशयित म्हणुन ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांपैकी त्यातील एकजण शुक्रवारी  रात्री कोरोना पॉझिटिव्ह आढळला.परंतू त्यापुर्वी 24 तास या संशयितांना  त्या 13 जणांबरोबर राञ काढली. या संशयितामुळे 13 जणा पैकी कितीजणांना संसर्ग झाला असेल याची तपासणी करावी लागणार आहे.पोलिस निरीक्षकांची एक चुक 13 जणांच्या जिवावर बेतणारी ठरणार आहे.
                  चारजणांची क्षमता असलेल्या कोठडीत  १३ जणांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह कैद्याने २४ तास काढले. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या हलगर्जीपणामुळे कोठडीतील १३ कैदी व कारागृहाचे आठ सुरक्षा पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. संशयित आरोपींना अटक करण्यापुर्वी  त्यांची कोरोना तपासणी करुन घेणे बंधनकारक आहे.
                  देसवंडी येथे गुरुवारी सकाळी पत्र्याचे शेड बांधण्याच्या कारणावरून दोन गटात घातक शस्त्राने तुंबळ हाणामारी झाली होती. त्यात आठ जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील एकवीस दिवसांनी गुरुवारी  पोलिसांना शरण आले. राहुरी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यांना इतर कैद्यांबरोबर कोठडीत  ठेवण्यापूर्वी त्यांची कोरोना टेस्ट करण्यासाठी स्वॅब घेण्यात आले. 
                  कोरोना तपासणीचा अहवाल मिळण्याची वाट न पाहता राहुरीचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दोन्ही आरोपींना गुरुवारी रात्री तेरा कैदी असलेल्या कोठडीत  ठेवले. शुक्रवारी रात्री त्यातील एक २३ वर्षांचा पोलिस कोठडीतील संशयित आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल पोलिस ठाण्यात धडकला.  त्यामुळे, राहुरी पोलिसांचे धाबे दणाणले. कोरोना पॉझिटिव्ह आरोपीला कोठडीतून हलविण्यासाठी धावपळ उडाली.कोठडीत  निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्याची वेळ आली.
                 कोरोना तपासणीचा अहवाल येईपर्यंत दोन्ही आरोपींना स्वतंत्र ठिकाणी सुरक्षितस्थळी ठेवणे अपेक्षित होते. परंतु, त्यांना कोठडीत ठेवण्याचा पोलिस निरीक्षक देशमुख यांचा अट्टाहास व हलगर्जीपणा नडला. त्यामुळे, कोठडीत  इतर तेरा कैदी कोरोना पॉझिटिव्ह आरोपीच्या संपर्कात आले. दोन दिवस कारागृहाच्या सुरक्षेसाठी तैनात आठ पोलीस कर्मचारी यांचाही संपर्क आला.  त्यामुळे, त्यांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पोलीस निरीक्षक देशमुख यांचा अट्टाहास व हलगर्जीपणा इतरांना जीवघेणा ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.
--------------------------------------------------------