Breaking News

कोविड केंद्रात "कोरोनाबाधित" रुग्णांना जिवंतपणी सोसाव्या लागतात मरण यातना ! रुग्ण वैतागले ?

कोविड केंद्रात "कोरोनाबाधित" रुग्णांना जिवंतपणी सोसाव्या लागतात मरण यातना ! रुग्ण वैतागले ?
नेवासा तालुका प्रतिनिधी :
नेवासा शहरातील मुलींच्या शासकिय वसतीगृहात सुरु केलेल्या कोविड केंद्रात रुग्णांना जिवंतपणीच 'मरण यातना' सोसण्याची वेळ कोरोना बाधित रुग्णांवर येवून ठेपली आहे.सध्या या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका सरकारी कर्मचाऱ्याने नांव न सांगण्याच्या अटिवर कोविड सेंटरच्या दुर्दशाचे कैफियत  प्रतिनिधींशी बोलतांना दिली.
   यावेळी माहीती देतांना कोरोनाबाधित सरकारी कर्मचारी बोलतांना म्हणाले की,या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना पिण्याचे पाणी नाही,मास्क,सॅनिटायझर दिले जात नाही,रुग्णांना शासकिय जेवन 'बे'चव आसल्याने बाहेरुन जेवन बोलवावे लागत आहे. स्वच्छतागृह तुंबले आहेत,कचराकुंड्या नाहीत,साफसफाईला कर्मचारी लवकर येत नाहीत,पंख्ये, ट्युबलाइट ना दुरुस्त झालेले आहेत,  सकाळी,संध्याकाळी दोन वेळेस कोरा चहा अन् 'बे'चव जेवन आहे. एका रुममध्ये चार रुग्ण कोंबले अाहेत सकाळ व सायंकाळी परिचारिका ताप तपासणी करून आठवड्याच्या गोळ्या  देवून निघून जात आहेत. कोणीही वैद्यकीय अधिकारी येत नाही.  कोरोनाबाधित रुग्णांवर आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याने कोविड सेंटरमधील रुग्णांना येथे जिवंतपणी 'मरणयातना' सोसाव्या लागत आसल्यामुळे रुग्णांवर होणारा खर्च नेमका कुठे जातो ? असा सवालही यावेळी बोलतांना या सरकारी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तालुक्यातील सर्व रुग्णांची टेस्ट आता याच  सेंटरमध्ये होत असल्यामुळे दिवसभर मोठी गर्दी येथे होत आहे. खरंच या रुग्णांवर  अन्याय होत आहे काय? कोराना  झाला आहे  ही त्यांची चूक आहे काय? असे अनेक प्रश्न कोरोणा बाधित रुग्णांना पडले आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकारी दखल घेऊन या रुग्णांना न्याय देतील काय? अशी  खंत ही या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. प्रामाणिक पणे  नोकरी करूनही शासकीय यंत्रणा आपल्याकडे का दुर्लक्ष करत आहे हा प्रश्न शासकीय कर्मचाऱ्यांपुढे पडला आहे. तर सर्वसामान्य रुग्णांचे काय?  असा सवालही रुग्णांच्या नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे .