Breaking News

कोपरगाव तालुक्यात ३१ रुग्णाची भर तर १७ कोरोनामुक्त !

कोपरगाव तालुक्यात ३१ रुग्णाची भर तर १७ कोरोनामुक्त !


करंजी प्रतिनिधी-
      आज शनिवार २२ ऑगस्ट रोजी कोपरगाव कोविड सेन्टर मध्ये एकूण ९७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २५ पॉजिटीव्ह तर ७२ अहवाल निगेटीव्ह आले तर काल नगर येथे पाठवलेल्या १९ अहवालपैकी ६ अहवाल पॉजिटीव्ह तर १३ अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
          यात कोपरगाव शहरातील तहसिल कार्यालय-१,निवारा-३, कालेमळा-१, टिळकनगर-१, दत्तनगर-१, गांधीनगर-३, कासली वाल कंपाउंड-१, शिवाजी रोड-१, कर्मवीर नगर-१, संजयनगर-१, हनुमान नगर-१, बुद्धीविहार-१, सराफ बाजार-१ तसेच ग्रामिण भागातील धरणगाव-३, सोनेवाडी-१, कोकमठाण-३, आपेगाव-३, येसगाव-१, भोजडे-१, शिंगणापूर-२ असे एकूण ३१ रुग्णाची भर पडली आहे.
  तसेच आज कोरोनवर मात करत पूर्णपणे बरे झालेल्या १७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे तर तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णाची संख्या १२ झाली आहे.
      आज अखेर तालुक्यातील एकूण रुग्णाची संख्या ५९५ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १८४ झाली आहे.