Breaking News

माजी आमदार वैभव पिचड यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, साथरोग प्रतिबंधक कायद्याचे केले उल्लंघन !

 माजी आमदार वैभव पिचड यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, साथरोग प्रतिबंधक कायद्याचे केले उल्लंघन !
अकोले प्रतिनिधी :
      दूध  दर वाढीसाठी आंदोलन करणाऱ्या अकोले तालुक्यातील माजी आमदार वैभवराव पिचड  जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, ज्येष्ठ नेते मधुकर नवले, शेतकरी नेते डॉ. अजित नवले, भाजपचे अध्यक्ष सीताराम भांगरे, कम्युनिस्ट नेते कॉ. कारभारी उगले, अॅड. शांताराम वाळुज, संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदीप कडलग, युवा स्वाभिमान संघटनेचे. संस्थापक महेश नवले  यांच्या सह विविध ५० कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
      शनिवारी अकोले व तालुक्यात विविध ठिकाणी दूधभाव व अनुदान प्रश्नी भाजप, दूध उत्पादक संघर्ष समिती, किसान सभेच्यावतीने रस्त्यावर एकत्र येत दूध रस्त्यावर ओतून शासनाचे विरुद्ध आंदोलन करण्यात आले. यामुळे  अकोले पोलीस ठाण्यात  आंदोलकांविरुद्ध १८८,२६९ साथीचा रोग प्रतिबंधक कायदा कलम १८९७ चे कलम २ व ३ प्रमाणे हे सर्व गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तालुक्यातील लिंगदेव येथे झालेल्या दूध आंदोलनप्रश्नी पो. कॉ. सुरेश घनश्याम पवार यांच्या फिर्यादीवरून भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम नथुजी भांगरे, विठ्ठल शिवराम कानवडे, सत्यवान भिवसेन कानवडे यांच्यासह अन्य १५ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 
     तर अकोले येथे करण्यात आलेल्या आंदोलन प्रकरणी पो. कॉ. चारुशीला अंबादास गोणके यांच्या फिर्यादीवरून संभाजी ब्रिगेडचे नेते डॉ. संदीप वसंतराव कडलग, युवा स्वाभिमान संघटनेचे संस्थापक महेश रमेश नवले, अध्यक्ष सुरेश नानाभाऊ नवले, कम्युनिस्ट पक्षाचे - ज्येष्ठ नेते अॅड. शांताराम नामदेव वाळुज, कॉ. कारभारी शंकर उगले, किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस व शेतकरी नेते डॉ. अजित सुभाष नवले यांच्यासह अन्य ८ कार्यकर्त्यांविरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
      तर भाजपच्यावतीने येथील सिद्धेश्वर दूध संस्थेसमोर करण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून माजी आमदार वैभव मधुकर पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम कोंडाजी गायकर, सिद्धेश्वर दूध संस्थेचे चेअरमन संदीप किसनराव शेटे, व्हा. चेअरमन अनिल जनार्दन गायकवाड, अमृतसागर दूधसंघाचे संचालक भाउपाटील भिमाजी नवले, प्रवीण तात्याबा धुमाळ, गोरक्ष गणपत मालुंजकर, ज्येष्ठ नेते मधुकर लक्ष्मण नवले, बुवासाहेब मल्टिस्टेटचे संचालक रमेश काशीनाथ नाईकवाडी यांच्यासह अन्य सात ते आठ अशा सुमारे ५० कार्यकत्यांविरुद्ध हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.