Breaking News

संजीवनी पाॅलीटेक्निकच्या मेकॅट्राॅनिक्स विभागास ‘एक्सलंट’ दर्जा !

संजीवनी  पाॅलीटेक्निकच्या मेकॅट्राॅनिक्स विभागास ‘एक्सलंट’ दर्जा !
( इतर चार विभागांना यापुर्वीच एनबीए मानांकन  प्राप्त )


कोपरगांव / तालुका प्रतिनिधी :
      संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकमध्ये महाराष्ट्र  राज्य तंत्र शिक्षण  मंडळ (एमएसबीटीई), मुंबई यांचे अखत्यारीत शैक्षणिक वर्ष  २०१९-२० साली संपुर्ण महाराष्ट्रात  एकमेव ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या मेकॅट्राॅनिक्स या पदविका अभियांत्रिकी शाखेला   एमएसबीटीई कडून नुकताच एक्सलंट दर्जा प्राप्त झाला आहे. तसेच सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग आणि काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी या विभागांना २०१६  ते २०२२ या कालावधीसाठी एनबीए, नवी दिल्ली यांचेकडून मानांकन  प्राप्त असल्यामुळे या विभागांना एमएसबीटीई कडून अगोदरच एक्सलंट दर्जा प्राप्त आहे, अशी  माहिती संजीवनी पालीटेक्निकच्या वतीने  प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
      पत्रकात पुढे म्हटले आहे की काळाची पावले ओळखुन नवोदित अभियंत्यांना आधुनिक ऊद्योग जगतात नोकरीच्या संधी मिळण्यासाठी संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकने शैक्षणिक वर्ष २०१९-२०  पासुन ‘डीप्लोमा इन मेकॅट्राॅनिक्स’ ही नवीन शाखा सुरू केली असुन ही शाखा इतर शाखांप्रमाणेच एमएसबीटीई, मुंबईशी  संलग्न आहे. सदर शाखेस  आखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद  (एआयसीटीई), नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षणालय (डीटीई), मुंबईची मान्यता मागील वर्षापासून  आहे. जगभरात सर्वच आधुनिक इंडस्ट्रीजमध्ये ऑटोमेशन  (स्वयंचलित) पध्दतीचा अवलंब केला जातो. यासाठी आवश्यक  ते कौशल्ये असणारे डीप्लोमा इंजिनिअर्स मिळावे अशी  आधुनिक ऊद्योगांची मागणी प्रचंड प्रमाणावर आहे. यामुळेच व्यवस्थापनाने ‘डीप्लोमा इन मेकॅट्राॅनिक्स’ ही महाराष्ट्रातील  एमएसबीटीई संलग्न डीप्लोमा पातळीवर पहिली ब्रॅच सुरू करून तांत्रिक शिक्षणात एक क्रांतिकारी पावुल टाकले आहे.
    या नवीन विद्याशाखेत मेकॅनिकल अँड इलेक्ट्राॅनिक्स, इंडस्ट्रीयल रोबोटीक्स, ऑटोमोटिव्ह  इलेक्ट्राॅनिक्स, मॅन्युफॅक्चरींग टेक्नाॅलाॅजी, मायक्रोस्केल मेकॅनिकल सिस्टीम अशा  प्रमुख विषयांचे ज्ञान प्रात्यक्षिकांसहित देण्यात येत आहे. यामुळे हे विद्यार्थी रोबोटीक्स, इन्स्ट्रमेंटेशन, साॅफ्टवेअर अँड प्रोग्रामींग, कंट्रोल इंजिनिअरींग, ऑटोमेशन अशा  क्षेत्रात पारंगत होवुन आधुनिक उद्योग जगतात सुरूवातीस वार्षिक  पॅकेज रू २ ते ६ लाखांपर्यंतची नोकरी मिळणार आहे.
      मेकॅट्राॅनिक्स ही संजीवनीमधिल महाराष्ट्रातील  एक्सलंट दर्जा असणारी एकमेव ब्रँच , तसेच सलग सहा वर्षांसाठी  सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग आणि काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी या शाखांना एनबीए, नवी दिल्लीचे मानांकने असणारे एकमेव संजीवनी के.बी. पी. पाॅलीटेक्निक, असा संजीवनीचा नावलौकिक आहे. येथनु उत्तिर्ण झालेल्या विध्यार्थ्यांना  हमखास नोकरी मिळवुन देण्यासाठी संजीवनी पाॅलीटेक्निक हे कटीबध्द असते. सध्या महाराष्ट्रात  सरकारने प्रथम वर्ष  पाॅलीटेक्निक ऑनलाईन  प्रवेश  प्रक्रिया दि. ४ सप्टेंबर पर्यत मुदतवाढ दिली आहे तर थेट द्वीतिय वर्षाच्या  प्रवेशासाठी दि ७ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. इ. १० वी व इ. १२ वी उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थांनी  या संधीचा फायदा घ्यावा, असे  आवाहन संस्थेच्या पत्रकात शेवटी केले आहे.  
       संजीवनीच्या या उपलब्धी बध्दल माजी मंत्री श्री शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे  यांनी प्राचार्य ए. आर. मिरीकर व सर्व विभाग प्रमुखांचे अभिनंदन केले आहे.