Breaking News

अकोले तालुक्यात आज पुन्हा आढळले २२ कोरोना पॉझिटिव्ह, कोरोना चा उद्रेक थांबेना !

अकोले तालुक्यात आज पुन्हा आढळले २२ कोरोना पॉझिटिव्ह, कोरोना  चा  उद्रेक थांबेना !
अकोले/ प्रतिनिधी :
   अकोले तालुक्यात आज मंगळवारी  दिवसभरात  नवीन 22 कोरोनाला  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
    अकोले तालुक्यात आज सकाळी   ११ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आल्यानंतर सायंकाळी उशिरा अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात पुन्हा १० व्यक्ती पॅाझिटीव्ह व पुन्हा खाजगीतील ०१व्यक्ती  पॅाझिटीव्ह आल्याने आज मंगळवारी दिवसभरात २२व्यक्ती कोरोना बाधित  आढळले.
     संगमनेर येथील मालपाणी लॅान्स कोविड सेंटर येथील अहवालात अकोले तालुक्यतील हिवरगाव आंबरे येथील ०८ तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात शहरातील एका डॅाक्टरसह 3 व्यक्ती पॅाझिटीव्ह  आढळले आहेत.तर खानापुर कोविड सेंटर येथे घेतलेल्या ४५ व्यक्तीच्या स्वॅबचा अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील अहवालात १० व्यक्ती बाधित आढळले.तर पुन्हा खाजगीतील ०१ व्यक्ती बाधित आढळले 

.मालपाणी लॅान्स येथे दिलेल्या स्वॅबच्या अहवालात तालुक्यातील हिवरगाव आंबरे येथील ४० वर्षीय महीला,  ४२ वर्षीय महीला,७२ वर्षीय  महीला ,२१ वर्षीय महीला ,३५वर्षीय  पुरुष,२०वर्षीय तरुण,१५ वर्षीय  तरुण,व  ०४ महिन्याच्या  बाळाचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे 
 खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात अकोले शहरातील पेट्रोल पंपाच्या मागील ४८ वर्षीय पुरुष,हिवरगाव आंबरे येथील ५७ वर्षीय  पुरुष व औरंगपुर येथील ४० वर्षीय महीला अशी एकुण ११ व्यक्ती कोरोना बाधित आले तर खानापुर कोविड सेंटरमध्ये दिलेल्या स्वॅबचा अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतील अहवालात मेहंदुरी येथील ६८ वर्षीय  पुरुष,३२वर्षीय पुरुष,२०वर्षीय  तरुण,४५वर्षीय  महीला, कोतुळ येथील ३० वर्षीय  महीला,कळस येथील ३७ वर्षीय  महीला,मनोहरपुर येथील ६०वर्षीय महीला,१२ वर्षीय  तरुण,तर पिंपळगाव खांड येथील ३५वर्षीय पुरुष,६० वर्षीय  महीला अशा  १० व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला  तर खाजगी प्रयोगशाळेत घोडसरवाडी येथील ७१ वर्षीय  पुरुष पॅाझिटीव्ह आला आहे  आज दिवसभरात तालुक्यातील २२ व्यक्ती कोरोना पॅाझिटीव्ह आल्या आहेत.यामुळे 
तालुक्यातील एकुण  बाधितांची  संख्या ३२३ झाली आहे.त्यापैकी २१८ व्यक्ती कोरोनामुक्त झाले.९६ व्यक्तीवर उपचार सुरू आहे तर ८ व्यक्ती मयत झालेल्या आहे.
---