Breaking News

कोपरगाव तालुक्यात ३० रुग्णाची भर !

कोपरगाव तालुक्यात ३० रुग्णाची भर
करंजी प्रतिनिधी- 
      आज दिनांक ५ ऑगस्ट रोजी कोपरगाव येथील कोविड सेन्टर मध्ये एकूण रॅपिड टेस्ट १७५ करण्यात आल्या असून यात ३० रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले असून १४५ अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले आहे.
       यात संजीवनी कारखाना परिसर-१०, शिंगणापूर-६, पोहेगाव-६, कोपरगाव शहर-२, डाऊच  खु-२ ,धारणगाव-१, कुंभारी-१, ब्राह्मणगाव-१ तसेच अंदरसुल ता येवला येथील कोपरगाव येथिल केअर सेंटर मध्ये ऍडमिट झालेल्या एका रुग्णाचा समावेश आहे असे आज कोपरगाव तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णाच्या संख्येत ३० रुग्णाची भर पडली आहे.