Breaking News

ऐतिहासिक क्षणाचे आपल्याला साक्षीदार होता आले, ही निश्चितच भाग्याची गोष्ट - कोल्हे

ऐतिहासिक क्षणाचे आपल्याला साक्षीदार होता आले, ही निश्चितच भाग्याची गोष्ट - कोल्हे
कोपरगाव / ता.प्रतिनिधी 
      श्री रामजन्मभूमी अयोध्या येथे आज मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हा आपल्यासाठी स्वाभिमान आणि अभिमानाचा प्रसंग असून या ऐतिहासिक क्षणाचे आपल्याला साक्षीदार होता आले, ही निश्चितच भाग्याची गोष्ट असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी केले.
      अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्र मंदिराचा भुमिपूजन सोहळा पार पडला. याच पाश्र्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात सोशल डिस्टन्ससह सह नियमांचे पालन करून प्रभु श्री रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी सौ कोल्हे पुढे म्हणाल्या, अयोध्या येथे श्री राममंदिर होण्यासाठी जे कारसेवक सहभागी झाले होते, त्यांच्या लढयाला ख-या अर्थाने यश आले आहे. अयोध्या येथे श्री प्रभुराममंदिर निर्माण करण्याचा दिलेला शब्द देशासाठी आयुष्य समर्पित केलेले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी खरा केला. प्रथम राष्ट्र, पक्ष आणि व्यक्ती या विचारधारेवर चालणा-या भारतीय जनता पक्षाच्या स्वप्नाची पुर्ती झाली असून हीच विचारधारा देशाला प्रगतीपथावर नेणार असल्याचे सौ कोल्हे म्हणाल्या. 
       यावेळी संपर्क कार्यालयात प्रभु श्री रामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन करून जय श्रीराम नामाचा जयघोष केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. कोपरगांव मतदारसंघात ठिकठिकाणी घरासमोर रांगोळ्या काढुन, घरात श्री  रामांचे प्रतिमापुजन करुन, दिप प्रज्वलन करुन, घरावार ध्वज फडकावुन व गुढी उभारुन, पेढे वाटुन ऐतिहासिक आनंद साजरा केला.