Breaking News

पारनेर तालुक्यात दिवसभरात २२अहवाल पॉझिटिव्ह, तालुक्यातील ४४ अहवाल निगिटिव्ह !

पारनेर तालुक्यात दिवसभरात २२ अहवाल पॉझिटिव्ह,
तालुक्यातील ४४ अहवाल निगिटिव्ह !


पारनेर प्रतिनिधी- 
     पारनेर तालुक्यातील आज दिवसभरात प्राप्त झालेल्या अहवालानुसार २२ अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
यामध्ये निघोज ६ भाळवणी १ कान्हूर पठार ४ पारनेर शहर २ जवळा ४ नालेगाव १ गुणवरे २ लोणीमावळा १ बाभूळवाडा १ यांचा पॉझिटिव अहवालात समावेश आहे तसेच कान्हूर पठार व जवळा या ठिकणी कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे.
पारनेर तालुक्यातील ४३ अहवाल किती प्राप्त झाले आहेत यामध्ये निघोज ९ देवीभोयरे ४ वडगाव गुंड ३ पारनेर ५ सिद्धेश्वर वाडी २ गुणवरे ७ नारायण गव्हाण १ सुपा १ कान्हूर पठार २ कोहकडी १ डिसकळ १ पिंपरी जलसेन १ टाकळी ढोकेश्वर १ भाळवणी ५ या गावांचा निगेटिव्ह अहवालात समावेश आहे
पारनेर तालुक्यातील आज प्राप्त झालेल्या अहवालत ४४ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे मात्र कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही देखील चिंतेची बाब आहे तालुक्यातील नागरिकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून कोरोना सदृश्य लक्षणे दिसताच त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे अहवान डॉ.प्रकाश लाळगे यांनी केले आहे.
पारनेर शहरातील एका डॉक्टर चा व पंचायत समिती अधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तालुक्यातील ज्या गावांमध्ये पॉझिटिव्ह व्यक्ती आढळले आहेत त्या व्यक्तीला राहत असलेला १०० मीटर चा परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे दिले आहेत.