Breaking News

शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नेवासा कोविड केंद्राला दिली अचानक भेट !

शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नेवासा कोविड केंद्राला दिली अचानक भेट, घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती ! 
--------------
रुग्णांवर लक्ष द्या अन्यथा कारवाईला सामोरे  जा - शिवसेनेचे खासदार लोखंडे यांचा सज्जड इशारा, नेवासा तालुका कोविड निधीतून वंचित का? जनतेचा सवाल !


नेवासा तालुका प्रतिनिधी :
      नेवासा कोविड सेंटरमध्ये नेमक चाललय काय, रुग्णांवर लक्ष नाही त्यांना वेळेवर चहा नाष्टा मिळत नाही, इमारती मधील पंख्ये बंद, शौचालये तुंबली,बेचव  भोजन व्यवस्था या संदर्भात शिवसेनेकडे तक्रारी दाखल होताच अचानक रविवार (दि.२२) रोजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नेवासा कोविड सेंटरला रविवारी सकाळी ११ वाजता भेट देवून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत थेट जिल्हाधिकारी राहूल व्दिवेदी यांच्याशी संपर्क साधून तत्काळ सुधारणा करण्याचे आदेश दिले. त्यामुळे  अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.
      नेवासा कोविड सेंटरमध्ये रुग्णांना दिवसातून एकदाही चहा नाष्टा मिळत नव्हता,इमारतीमधील पंख्ये बंद होते,शौचालयेही तुंबलेली,त्यातच रुग्णांना मिळणारे बेचव भोजन,रुग्णांवर आरोग्य खात्याचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी शिवसेनेकडे प्राप्त झालेल्या होत्या याची दखल घेवून शिवसेनेचे उत्तर नगरजिल्हा उपप्रमुख हरीभाऊ शेळके यांनी सुधारणा न झाल्यास शिवसेना नेवासा कोविड सेंटरमध्ये जावून थेट सेनास्टॉलईने आंदोलन करणार ! असल्याचा इशारा  दिला होता त्याची दखल घेत खासदार लोखंडे  रविवारी सकाळी ११ वाजता कोविड केंद्रात दाखल झाले.
      यावेळी कोविड सेंटरमध्ये तहसिलदार रुपेशकुमार सुराणा, तालूका आरोग्य अधिकारी डॉ अभिराज सुर्यवंशी,नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक रणजित डेरे आदी उपस्थित होते यावेळी खासदार लोखंडे यांनी कोविड सेंटरमध्ये बंद असलेले पंख्ये,शौचालयाची दुरावस्था रुग्णांना चहा नाष्टा मिळत नसल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच झडाझडती घेवून थेट भोजन कक्षात धाव घेत कोरोनाबाधीतांना मिळणाऱ्या बे'चव' जेवनामुळे भाज्यापाल्याची पाहणी करुन थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यामुळे अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली. यावेळी तहसिलदार सुराणा यांनी सुविधेसाठी निधी येत नसल्याचे खासदार लोखंडे यांना गऱ्हाणे मांडताच थेट भ्रमनध्वनीवर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करुन लोखंडे यांनी निधीचा प्रश्न चुटकी सरशी सोडवला कोरोनाबाधीत रुग्णांवर लक्ष ठेवा तक्रार येता कामा नये अन्यथा कारवाई कली जाईल असा सज्जड इशारीही या भेटी दरम्यान खासदार लोखंडे यांनी दिला यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हरीभाऊ शेळके,युवा सेनेचे जिल्हा प्रमुख निरज नांगरे,शहर प्रमुख नितीन जगताप,भाजपा तालूकाध्यक्ष नितीन दिनकर,शिवसेना तालूका उपप्रमुख पंकज लांभाते,मुन्ना चक्रणारायण,नारायण लष्करे कल्याण विखे,मकरंद राजंस आदी उपस्थित होते. यावेळी केविड सेंटरमधील अडीअडचणी सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्याने सर्वञ खासदारांचे कौतूक केले जात आहे. नेवासा तालुका कोविड निधीतून वंचित का असाही सवाल जनतेमधून उपस्थित केला जात आहे.