अयोध्या येथील श्रीराम मंदिर भूमी पूजनाच्या निमित्ताने श्री क्षेत्र काकणेवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन ! टाकळी ढोकेश्वर प्रतिन...
अयोध्या येथील श्रीराम मंदिर भूमी पूजनाच्या निमित्ताने श्री क्षेत्र काकणेवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन !
टाकळी ढोकेश्वर प्रतिनिधी :
अध्यात्मिक क्षेत्रात कायम अग्रगण्य राहणाऱ्या क्षेत्र काकानेवाडी येथे श्रीराम मंदिरात कृष्णकृपांकित डॉ विकासनंदजी महाराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल डिस्टन पाळून विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्रीराम मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रांगोळी आणि फुलांच्या हाराने मंदिर सजवण्यात आले होते.
सकाळी श्रीराम सप्ताह समिती मुंबईकर मंडळ व ग्रामस्थ काकणेवाडी यांच्या वतीने श्रींची महाआरती व भजन करण्यात आले . भूमी पूजनाच्या मुहूर्तावर प्रभू श्रीरामाचा महाअभिषेक करण्यात आला.महाभिषेकचे यजमान म्हणून भगवान वाळुंज व प्रा. गुलाबराव वाळुंज सपत्नीक उपस्थित होते. संध्याकाळीही महाआरती चे आयोजन करण्यात आले होते.या वेळी श्रीराम मंदिर प्रांगणात दीपोत्सव साजरा करण्यात आला नंतर प्रा कोठावळे सर यांचे श्री रामचरित्रावर प्रवचन झाले व शेवटी लाडूचा महाप्रसाद वाटून व दत्तात्रय नवले यांच्या मनोगताने कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमासाठी उदयोजक जयवंत शेठ वाळुंज व मुंबईकर मंडळाने विशेष सहकार्य केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भास्कर वाळुंज ह भप. दादाभाऊ महाराज विजय वाळुंज गुरुजी रंगनाथ महाराज वाळुंज प्रशांत महाराज वाळुंज तसेच किशोर वाळुंज ऋषिकेश वाळुंज शुभम वाळुंज आदित्य वाळुंज वृषाली वाळुंज आरती वाळुंज पायल वाळुंज ऋतुजा वाळुंज यांनी विशेष प्रयत्न केले.