Breaking News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानांचा फोन, मुंबईतील पावसावर झाली चर्चा

Uddhav Thackeray to meet PM Modi before Dec 13, will seek aid for ...

मुंबई | काल (५ ऑगस्ट) राज्यात मुंबईसह अनेक उपनगरात मुसळधार पाऊस झाला. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला होता. मुंबईतल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. केंद्र सरकार सर्वतोपरी राज्य सरकारला मदत करेल, अशी आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले आणि काळजी घेण्यास देखील सांगितले.

मुंबईमध्ये काल एका दिवसात विक्रमी पावसाची नोंद झाली. आज आत्तापर्यंत कुलाब्याला २९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी १० ऑगस्ट १९९८ ला २६१ मिमी पावसाची नोंद झाली होती, त्याचा विक्रम पावसानं आज मोडून काढलाय. मस्जिद रेल्वे स्थानकात अडकलेल्या २९० प्रवाशांची एनडीआरएफने सुखरुप सुटका केली आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन केले आहे.