Breaking News

पारनेर तालुक्यात आज ५ कोरोना बाधित, तालुक्यातील २७ अहवाल निगिटिव्ह !

पारनेर तालुक्यात आज ५ कोरोना बाधित !
--------------
तालुक्यातील २७ अहवाल निगिटिव्ह !
पारनेर प्रतिनिधी-  
      पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे आज प्राप्त झालेल्या अहवाला नुसार ५ जणांना कोरोना ची बाधा झाली असल्याचे कोरोना चाचणी अहवालावरून निष्पन्न झाले आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
   यामध्ये रायतळे १ पाडळी रांजणगाव १ सुपा १ पाठरवाडी १ गोरेगाव १ यांचा पोजिटिव्ह अहवालात समावेश आहे
    तालुक्यात आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये ५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
    तर निगेटीव्ह २७ अहवालात निघोज ९ देवीभोयरे १ पारनेर ४ गोरेगाव १ पाबळ २ सावरगाव २ नारायणगव्हाण ३ वडझिरे ५ या व्यक्ती चा अहवाल निगिटिव्ह प्राप्त झाला आहे
      पारनेर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३५० पार झाली असून दररोज संख्या वाढत आहे ही तालुक्यातील जनतेसाठी चिंतेची बाब आहे.
ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कोरोना चाचणीत अहवालात आलेले आहेत तेथील १०० मिटर परिसर कंटेन्मेंट झोन घोषित केल्या चे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.