Breaking News

पारनेर तालुक्यातील १८ अहवाल पॉझिटिव्ह, कोरोनामुळे कान्हूर पठार येथील ८० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू !

पारनेर तालुक्यातील १८ अहवाल पॉझिटिव्ह, कोरोनामुळे कान्हूर पठार येथील ८० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू !
---------
निघोज येथील डॉक्टरला कोरोनाची लागण !


पारनेर प्रतिनिधी-
    पारनेर तालुक्यातील दि. २३ रोजी संध्याकाळी पाचपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार १८ व्यक्तींना कोरोना ची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाली आहे कान्हूर पठार येथील ८० वर्षीय व्यक्तीचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे तर १४ अहवाल निगेटिव्ह  प्राप्त झाले आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
पॉझिटिव्ह अहवालामध्ये मध्ये पारनेर २ निघोज १ दैठणे गुंजाळ १ टाकळी ढोकेश्वर १ कान्हूर पठार ४ कर्जुले हर्या १ खडकवाडी १ सारोळा अडवाई २ जवळा १ गुणोरे १ सिद्धेश्वर वाडी १ रायतळे १ या गावांचा पॉजिटीव्ह मध्ये समावेश आहे.
     निगेटिव्ह अहवालामध्ये पारनेर ७ निघोज २ जवळा १ वडगाव गुंड २ देवीभोयरे १ किंन्ही १ याचा निगेटिव्ह अहवालात समावेश आहे.
दरम्यान कान्हूर पठार येथे कोरोना चा संसर्ग वाढत आहे काही दिवसापूर्वी येथील एका ८० वर्षीय व्यक्तीला कोरोना ची लागण झाली त्यानंतर त्यांच्यावर नगर येथे उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला तसेच त्यांच्या कुटुंबातील इतरही सदस्यांना कोरोना लागण झाली होती त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चांगली असल्याचे समजते
पारनेर तालुक्यातील एकूण १६ व्यक्तींचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.