Breaking News

वसूली कर्मचाऱ्यास मारहाण करुन लुटल्या प्रकरणी नेवासा पोलिसांकडून चोरटे गजाआड !

खासगी फायनान्स कंपनीच्या वसूली कर्मचाऱ्यास मारहाण करुन लुटल्या प्रकरणी नेवासा पोलिसांकडून चोरट्यांना गजाआड करुन मुद्देमाल हस्तगत करण्यात यश !
नेवासा तालुका प्रतिनिधी :
       नेवासा तालूक्यातील वाशिम येथून गंगापूरकडे जात असलेल्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यास अज्ञात दोन चोरट्यांनी दुचाकीवरुन खाली पाडून लाकडी दांडक्याने मारहाण करुन दुचाकीसह १ लाख ८२ हजार रुपये बळजबरीने हिसकावून चोरटे पसार झाले होते ही घटना सोमवार (दि. ३) ऑगस्ट रोजी घडली होती याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीच्या घटनेचा तपास नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस उपनिरिक्षक निलेशकुमार वाघ यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुप्त माहीतीच्या आधारे या गुन्ह्यातील चार आरोपींना गजाआड करुन गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह १ लाख २ हजार ७०० रुपये हस्तगत करण्यात नेवासा पोलिसांना यश आले आहे.
        या घटनेबाबत अधिक वृत्त असे की,स्वतंञ मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड या कंपणीची वसूली करुन नेवासा तालूक्यातील वाशिम येथून गंगापूरकडे दुचाकीवरुन जात असलेले वसुली कर्मचारी राजेंद्र वासूदेव खंडारे (वय ३४) याला अज्ञात दोन चोरट्यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करुन फायनान्स कंपणीची वसूली असलेल्या बँगेतून रोख रक्कम १ लाख ८२ हजार रुपये बळजबरीने चोरुन घेवून चोरटे पसार झाले होते. या चोरीच्या घटनेचा तपास पोलिस निरिक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक निलेशकुमार वाघ यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह गुप्त खबऱ्यांच्या माहीतीच्या आधारे या गुन्ह्यातील आरोपी राहूल एकनाथ उदमले (१९) रा.कानडगांव,ता,गंगापूर, जि.औरंगाबाद विशाल रामभाऊ पवार (वय २०) रा.सिद्धीवाडी ता.गंगापूर,जि.औरंगाबाद,अमित उत्तम तनपूरे (वय २६) रा.भालगांव ता,नेवासा,जि.अहमदनगर,   अकिल शकिल शेख (वय २४) रा.भालगांव ता.नेवासा जि.अहमदनगर या चोरट्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह रोख रक्कम १,०२,७००  नेवासा पोलिसांना हस्तगत करण्यात यश आले आहे या तपासाकामी पो.कॉ.कैलास साळवे,पो.कॉ.राहूल यादव,पो.कॉ सुहास गायकवाड,पो.कॉ भागवत शिंदे,पो.कॉ.गणेश इथापे आदींनी परिश्रम घेतले. नेवासा पोलिसांनी जबरी चोरीतील आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत केल्याप्रकरणी पोलिस अधिक्षक अखिलेशकुमार सिंग,अप्पर पोलिस अधिक्षक दिपाली काळे -(कांबळे),उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांनी नेवासा पोलिसांचे कौतूक केले. या तपासकामी सायबर सेल श्रीरामपूर यांचीहि मदत घेण्यात आली होती.