Breaking News

नाटेगावातील त्या शौचालयांची चौकशी सुरु, आठ दिवसात अहवाल सादर होणार !

नाटेगावातील त्या शौचालयांची चौकशी सुरु, आठ दिवसात अहवाल सादर होणार 
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
        कोपरगाव   तालुक्यातील  नाटेगाव येथील शौचालय घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या पासून जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी व पंचायत समिती पर्यंत गेली असून गटविकास अधिकारी यांनी ४ तारखे पासून प्रत्यक्ष चौकशी साठी दोन विस्तार अधिका-यांची कमिटी नाटेगावात पाठविली असुन सर्व शौचालयांची चौकशी होणार आसल्याने अनेकांचे धाबे दणानले आहे .
       नाटेगाव येथील ग्रामपंचायतीच्या शौचालयांच्या कामात गैरव्यवहार झाला असुन गेली पाच वर्षापासुन गावात झालेल्या शौचालयांच्या कामांची चौकशी करुन दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नाटेगाव येथील  ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती  संबंधित लाभार्थींनी ग्रामसेवक व सरपंचांना हाताशी धरून शौचालयाचे अनुदान लाटल्याचा आरोप करून   या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येणार आहे यामध्ये अनेक लाभार्थीनी प्रत्यक्ष शौचालय बांधलेले नाही अनेक लाभार्थीनी जुने शौचालय दाखविलेले, तसेच एकाच कुटुंबात एकापेक्षा अधिक लाभार्थी ना अनुदान दिले आहे याचीही चौकशी करण्याची मागणी केली होती त्या अनुशंगाने ग्रामस्थांच्या या मागणीच्या दैनिक लोकमंथनने वेळोवेळी बातम्या दिल्या होत्या याची दखल गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांनी घेऊन दि.४ आॕगस्ट पासुन अशा शौचालयांच्या चौकशी साठी पंचायत समितीचे विस्तार अधीकारी डी.ओ.रानमाळ व वाघमोडे बी.बी.यांची नियुक्ती केली असुन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी  करुन चौकशीला सुरुवात केली आहे नाटेगावातील अनुदानीत सर्व  शौचालयांची चौकशी  करणार असुन आठ दिवसात आपला अहवाल सादर करणार आहे तर  गटविकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी यांच्या मार्फत चौकशी सुरू केली आहे मात्र त्या प्रमाणे घरोघर जाऊन सर्वे सुरू देखील झाला आहे मात्र तक्रार अर्जात नमूद केल्या प्रमाणे मिळकत नंबर ,
 मिळकत धारकाचे नाव,शौचालय मागणीचा अर्ज कोणी केला, सदर अर्ज कुठे व कोणी भरला,शौचालय मागणी करताना २०००- रुपये भरले किंवा नाही,शौचालय बांधकाम करणारी व्यक्ती गावात राहत आहे की ग्रामपंचायत हद्दी बाहेर ,शौचायल वापरात आहे किंवा नाही, शौचालयाचे अनुदान प्राप्त झाले किंवा नाही, या पूर्वीचे शौचालय होते किंवा नाही कुटुंबातील किती व्यक्तीच्या नावे शौचालय आहे , घर बांधकामाची नोंद व त्याची पट्टी भरलेली आहे किंवा नाहीया सर्व मुद्द्यावर आधारे सर्वे होणे अपेक्षित होते व आहे मात्र केवळ आहे ते शौचालयाची पाहणी सुरू असून हा केवळ चौकशी चा फार्स आहे असे दिसते तरी या कामाची सखोल चौकशी झाली पाहिजे 
प्रकरण वादातीत असल्याने आजच या विषयी योग्य मागणी केली तर सत्यता समोर येणार असल्याचे अर्जदार ग्रामस्थांचे म्हणने आहे.

कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांच्या आदेशावरुन. नाटेगाव येथे जेवढेही अनुदानीत शौचालये झालेली आहे ज्यांना अनुदान दिलेले आहे अशा सर्वच शौचालयांची सखोल चौकशी चालु  असुन आठ दिवसात सदर चौकशी अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना दिला जाईल .
----
 ( डी.ओ.रानमाळ. विस्तार अधिकारी पंचायत समिती कोपरगाव)