Breaking News

डाऊच खुर्द गावात कोरोना योध्दा गायत्री देवीदास बढे यांचा सत्कार.

डाऊच  खुर्द  गावात  कोरोना योध्दा   गायत्री  देवीदास  बढे यांचा  सत्कार.
करंजी  प्रतिनिधी- 
     कोपरगाव  तालुक्यातील  डाऊच खुर्द  गावात  शिर्डी  येथील साईनाथ   हॉस्पिटलमध्ये  कोरोना रुग्णांची  सेवा  करणाऱ्या  गायत्री बढे  यांचा  या  सेवेबद्दल  डाऊच खुर्द  गावचे  सरपंच  संजय गुरसळ  यांच्या  वतीने  सत्कार करण्यात  आला.
    गायत्री  देविदास  बढे  या कोपरगाव  येथील  वास्तव्यास असल्या  तरी  त्यांचे  मुळ  गाव  हे  डाऊच  खुर्द  आहे. त्या  गेल्या काही  दिवसांपासून  शिर्डी  येथील  कोविड  केअर  सेंटर साईनाथ  हॉस्पिटलमध्ये  अहोरात्र  कोरोना   रुग्णांची  सेवा करत  आहे.  आज  कोरोना सारख्या  महाभयंकर  संसर्गजन्य आजाराचा  प्रादुर्भाव  महाराष्ट्र बरोबर  नगर  जिल्ह्यात  देखील  वाढताना   दिसून   येत  आहे. यातच  या  वाढणाऱ्या  कोरोना रुग्णाच्या  उपचारासाठी  सरकारने  कोविड  केअर  सेंटर सुरू  केले  त्यात  आपल्या जीवाची  पर्वा  न  करता  मेडिकल   विभागातील  कर्मचारी सेवा  करत  आहे  त्यातच   एक म्हणजे  आमच्या  गावच्या सुनबाई  गायत्री  देविदास  बढे  या  देखील  कोरोना  रुग्णाची सेवा  करत  असून  ही  आमच्या गावासाठी   एक  अभिमानाची गोष्ट  आहे  आजच्या  या महामारीत  आपल्या  जीवाची पर्वा  न  करता  कार्य  करत असणारेच  खरे  कोरोना  योद्धे आहे  असे  या  वेळी  डाऊच  खुर्द  गावचे  सरपंच  संजय गुरसळ  यांनी  सांगितले.
   यावेळी क्षत्रिय धनगर समाज सेवा संघटनेचे टिक्कल सर युवा तालुका अध्यक्ष किरण भाऊ थोरात तसेच आमच्या गावचे मार्गदर्शक बाळासाहेब बढे, दिगंबर पवार, चंद्रकांत गुरसळ, देविदास बढे ,बाबासाहेब बढे, रवींद्र बढे ,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
  या   वेळी  सौ  गायत्री  यांनी आव्हान  केले  की  अजूनही कोरोना  चा  धोका  गेला  नसून प्रत्येकाने  प्रशासनाने  घालून दिलेल्या  नियमाचे  काटेकोर  पणे पालन  करून  स्वतः  सोबत आपल्या  परिवाराची  देखील काळजी  घेणे.