Breaking News

कोपरगाव गटविकास अधिका-यांच्या पञाला मायगाव देवी ग्रामपंचायत कडुन केराची टोपली!

कोपरगाव गटविकास अधिका-यांच्या पञाला मायगाव देवी ग्रामपंचायत कडुन केराची टोपली!
 ( गावात आजार पसरण्याची शक्यता )


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी गावातील नागरिकांच्या घरासमोर गल्लीत  तुंबलेले गटार व पावसाचे पाणी साईड गटार करुन काठुन द्यावे स्थानिक पातळीवर प्रश्न सोडवावा असे लेखी पञ कोपरगाव पंचायत समितीच्या गटविकास  अधिकारी  यांनी ग्रामपंचायतला देऊनही ग्रामपंचायत कडून गटविकास अधिकाऱ्यांच्या पञालाही केराची टोपली दाखवत एक महिना होत आला अद्याप पर्यत कुठलीच कार्यवाही केली नसल्याचे अर्जदार ग्रामस्थाचे म्हणने असुन डास,मच्छर व दुर्गधी मुळे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येते नाही तसे झाल्यास सर्वस्वी जबाबदार ग्रामपंचायत व गटविकास अधिकारी  राहतील असे ग्रामस्थांचे म्हणने असुन ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळणा-या ग्रामपंचायतला जाग कधी येणार असा प्रश्न अर्जदारांनी प्रसिध्दीस दिलेल्या पञकाव्दारे केला आहे.
 ग्रामस्थांनी प्रसिद्धीस दिलेल्या  पञकात म्हटले आहे की मायगाव देवी गावातील चांभार गल्ली भागात रस्त्यावर गटार व पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते त्याचा ञास तेथील रहिवासी व जाणाऱ्या येणाऱ्यांना होतो साचलेल्या पाण्यात डास,मच्छर झाले व दुर्गधी सुटण्यास सुरूवात झाली रस्त्याला साईड गटार करुन पाणी जाण्याची सोय करावी असा लेखी अर्ज जयसिंग ज्ञानेश्वर गाडे व रहिवाश्यांनी ग्रामपंचायतला दिला वेळोवेळी तोंडीही सांगितले ग्रामसेवक व पदाधिका-यांनी फक्त पहाणी केली कुठलीच कार्यवाही केली नाही एकीकडे तालुक्यात  कोरोणा सारख्या माहामारीने धुमाकुळ घातला शहरासह ग्रामिण  भागातही दिवसागणीक रुग्ण वाढत असतानाही आजाराला खतपाणी घालणाऱ्या  समस्यांची   ग्रामपंचायत दखल घेत नसल्याने आजार वाढल्यास त्यास सर्वस्वी ग्रामपंचायतच जबाबदार राहील असा इशारा या भागातील रहिवास्यांनी दिला असुन परत गटविकास अधीका-यांकडे अर्ज करणार असल्याचे रहिवास्यांनी सांगितले .

 मुंजोबा गल्ली व चांभार गल्ली या ठीकाणी प्रथमच पाणी साठले सदर ठिकाणी ग्रामनिधीतुन  मुरुम टाकायचा असुन इस्टीमेंट करुन चार दिवसात हा प्रश्न कायमस्वरुपी सोडवणार असुन यापुढे या भागातील नागरिकांची कुठलीही तक्रार राहणार नाही.
--------------
   बी.ओ.पाटील ग्रामसेवक 
    ग्रामपंचायत मायगाव देवी