Breaking News

रक्षाबंधनचे औचित्य साधून केडगाव जागरूक नागरिक मंचाचे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

रक्षाबंधनचे औचित्य साधून केडगाव जागरूक नागरिक मंचाचे विविध कार्यक्रमांचे आयोजन !
केडगाव/प्रतिनिधी :
   श्रावण महिन्यातील रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून केडगाव जागरूक नागरिक मंच अहमदनगर या सेवाभावी सामाजिक संस्थेकडून पोलीस चौकी केडगाव येथील पोलीस बांधवांचे तसेच अत्यावश्यक रूग्णवाहिका (108)चालक व कर्मचारी यांनीकोरोना काळात करत असलेल्या अथक परिश्रमाबद्दल पुष्पगुच्छ व मास्क देऊन आभार व्यक्त करण्यात आले तसेच केडगाव जागरूक नागरिक मंचाच्या महिला पदाधिकार्‍यांनी रक्षणकर्त्या पोलीस बांधवांना राख्या बांधून भाऊ-बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण साजरा केला                     औक्षण करून आपल्या भावाला दीर्घायुष्य आरोग्यपूर्ण जीवन लाभावे यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली .पोलिसांनी भगिनींना गोड मिठाई भरवली कोरोनाच्या प्रचंड तणावाच्या परिस्थितीत पोलिसांना तणावमुक्त करून त्यांचा उत्साह व मनोबल वाढवण्यासाठी मंचाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे संस्थेचे अध्यक्ष  विशाल पाचरणे यांनी मत व्यक्त केले केडगाव जागरूक नागरिक मंच ह्या विचारांनी प्रगल्भ असलेल्या संस्थेलाही आमचे पूर्णत: सहकार्य राहील अशी ग्वाही केडगाव पोलीस चौकीचे सहाय्यक निरीक्षक नितीन रणदिवे  यांनी दिली. प्रसंगी हेड कॉन्स्टेबल जाधव , पोलीस नाईक,  गर्जे , पोलीस शिपाई गांगुर्डे , होमगार्ड मंदार सटाणकर तसेच प्रवीण पाटसकर उपस्थित होते गणेश पाटोळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले कार्यक्रमाचे आभार संस्थेचे अंबिकानगर विभाग प्रमुख डॉक्टर साळवे यांनी केले.