Breaking News

कोपरगाव मधील वाढती कोरोना आकडेवारी धक्कादायक !

कोपरगाव मधील वाढती कोरोना आकडेवारी धक्कादायक
करंजी प्रतिनिधी-
आज दि १७ ऑगस्ट सोमवार  रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये ९५ रुग्णांचे रॅपिड टेस्ट करण्यात आले त्यामध्ये तब्बल ३२ जणांचे  अहवाल पॉझिटिव्ह तर ६३ निगेटिव्ह आले तसेच नासिक येथील खाजगी लॅब च्या रिपोर्ट नुसार  १ पॉझिटिव्ह अहवाल आल्याने आज कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या ३३ झाली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
   यात कोपरगाव शहरातील सप्तर्षी मळा - १ गजानन नगर - १ सुभद्रा नगर - १ टिळक नगर - ३ बँक रोड -१ संजीवनी परिसर -१ खडकी -१ निवारा -२
धारणगाव  रोड- २ दत्तनगर - १
गांधी नगर - १ विवेकानंदनगर - २
टाकली रोड - १ कुलस्वामिनी समोर - ३ राम  मंदिर - १ पोलीस वसाहत - ३ यशवंत चौक - २
असे कोपरगाव शहरातील २७  तर कोपरगाव ग्रामीण भागातील देर्डे - १ शाहजापूर -१ ब्राह्मणगाव - १ सुरेगाव - २ जेऊर कुंभारी - १
असे ग्रामिण भागात ६ रुग्ण सापडले असून आज तालुक्यातील एकूण रुग्णाची संख्या ३३ झाली आहे.
   तसेच आज रोजी कोरोना वर मात करत ७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आज पर्यंत तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या झाली ४५७ तसेच सध्या ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ११९ झाली आहे.