Breaking News

पद्मश्री विठ्ठलराव विखे विकासाचे युगपुरूष- शशिकांत वाबळे !

पद्मश्री विठ्ठलराव विखे विकासाचे युगपुरूष- शशिकांत वाबळे !
कान्हेगाव/प्रतिनिधी
     शेती, सहकार, शिक्षण, ग्रामीण अर्थ कारण असा बहुअंगी विकास साधणू विकासाची गंगा निर्माण करणारे  पद्मश्री विखे पाटील विकासाचे युगपुरुष होते असे प्रतिपादन सुरेगाव ग्रामपंचायत चे सरपंच शशिकांत वाबळे यांनी केले कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत च्या वतीने पद्मश्री विठ्ठल राव विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंती चे  आयोजन करण्यात आले होते यावेळी  शशिकांत वाबळे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला यावेळी सरपंच तथा बीएसएस ट्रेडर्स चे संचालक शशिकांत वाबळे ,तलाठी गणेश गर्कल, कु्षी सहाय्यक देशमुख मँडम ग्रामपंचायत सदस्य डॉ. आय.के.सय्यद, मछिंद्र हाळनोर,कु्षी मित्र कैलास कदम विकास जाधव उपस्थित होते  पदमश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जीवन कार्याचा आढावा घेताना सरपंच वाबळे यांनी सांगितले कि,आशिया खंडातील सहकारातून पहिल्या क्रमांकाचा साखर कारखान्याची निर्मिती चे शिल्पकार व कारखान्याच्या माध्यमातून
ग्रामीण समाजाचा विकासाचा पाया घातला  स्व. विखे पाटील यांनी जिल्हापरिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजना राबविण्यासाठी
लोकल कमिटीच्या  निवडणूकीत  सहभाग घेऊन यश संपादन केले तसेच  व्यापार्यांचे हित साधून त्यांना राजमार्ग निर्माण करून दिला असे शेवटी वाबळे म्हणाले यावेळी ग्रामपंचायत चे कोंडीराम निकम, बापू कदम ,अण्णा वाबळे ,राहुल निकम, बाळू कदम उपस्थित होते .