Breaking News

ओझरच्या गणपती मंदिरातील चोरी झालेली चांदीची छत्री पोलिसांनी चोरट्यांकडून केली हस्तगत !

ओझरच्या गणपती मंदिरातील चोरी झालेली चांदीची छत्री पोलिसांनी चोरट्यांकडून केली हस्तगत

चोरी प्रकरणात ओतूर पोलिसांनी पकडलेला आरोपी ( छाया -- रमेश तांबे )

ओतूर/प्रतिनिधी :
    श्री ओझरच्या विघ्नहर गणपती मंदिरात दि.२७ जुलै रोजी दोन अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करून मंदिरातील चांदीची दीड किलो वजनाची सोन्याचे वज्रलेप केलेली छत्री व दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबविली होती याबाबतची तक्रार ओतूर पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती.दरम्यान या चोरीचा ओतूर पोलिस तपास करत असतानाच आळेफाटा पोलिसांनी पोलीस स्टेशन हद्दीत मंगरूळ येथील झापवाडीत मुक्ताई मंदिरात चोरी करण्यासाठी आलेल्या दोन दरोडेखोरांना चोरीच्या साहित्यासह आळेफाटा पोलिसांनी पकडले होते व त्यांचे इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले होते.पकडलेल्या दोघां चोरटे चोरट्यांकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने ओझर येथील गणपती मंदिरातील चोरी केली असल्याचे तपासादरम्यान सांगितले.संदीप सखाराम पथवे वय ३० वर्षे,विठ्ठल महादू पतवे ४५ वर्षे,लक्ष्मण विठ्ठल पथवे वय २५ वर्षे अविनाश पांडुरंग सावंत २६ वर्षे, सर्व राहणार कळस खुर्द ता.अकोले जि. अहमदनगर यांच्यावर ओतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण विठ्ठल पतवे अविनाश पांडुरंग सावंत हे दोघे आरोपी अद्याप फरार आहेत. जुन्नर तालुक्यातील मंगरूळ येथील झापवाडी येथे  दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन दरोडेखोरांना आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी पकडले होते.  
        अटक केलेल्या आरोपींंकडून दुचाकीसह चॅापर, कोयता, पहाने, कटावणी असे दरोडा घालण्यासाठी आणलेले साहित्य पोलीसांनी जप्त केले आहे. तपासादरम्यान सदर दरोडेखोरांनी ओझरच्या विघ्नहर गणपती मंदिरातून २७ जुलैला साधारण दीड किलो वजनाच्या चांदीत घडवलेली सुवर्णलेपीत छत्री पळवून नेली होती. तर गाभाऱ्यात असलेल्या दोन दानपेट्यांपैकी एक दानपेटी फोडून रक्कम लांबवली होती. ही चोरी देखील याच आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाल्याने या गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींना ओतूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यातील आरोपी संदीप सखाराम पतवे यांनी त्यांच्या घरातील कपाटामध्ये ओझर गणपती मंदिरातील चोरलेली चांदीची छत्री लपून ठेवल्याचे सांगितले.ओतूर पोलिसांनी  संदीप पातवेच्या घरी कपाटात ठेवलेली चांदीची छत्री हस्तगत केली. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील,जुन्नर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खंन्ना, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे,पोलीस नाईक विकास गोसावी, पोपट मोहरे,पंकज पारखे,देविदास खेडकर नवनाथ कोकाटे यांनी केली.