Breaking News

गोदावरी जलनिःसारण कार्यालय असुन अडचण नसुन खोळंबा !

गोदावरी जलनिःसारण कार्यालय असुन अडचण नसुन खोळंबा
-------------
दहेगांव(बो)येथील शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
-----------


कोपरगाव प्रतिनिधी -
जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत कामकाज चालत असलेले  गोदावरी कालवे जलनिःसारण उपविभागिय कार्यालय कोपरगाव येथे असुन, पाठीमागुन काटेरी कुंपन आसपासची दलदल बघुन कुणीही कल्पनादेखील करणार नाही की,येथुन दहा तालुक्यांचा कारभार चालत असेल.बाह्यरंग जशे तशीच अंतरंगातील कार्यालयीन प्रमुखांसह कर्मचारी वर्गाचीही शेतकऱ्यांची कामे करण्याची  उदासिनता बघुन सध्या या कार्यालयाची स्थिती असुन अडचण नसुन खोळंबा अशी झाली असुन,दहेगाव(बो.)येथील शेतकरी रणजीत जगताप यांनी या कार्यालयीन कामकाजाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाव्दारे तक्रार केली आहे.

             दहेगांव (बो)चर योजना गट नंबर २१८या क्षेत्रातुन गेली असुन त्यात संबंधित शेतकऱ्याचे सव्हिस गुंठे क्षेत्र संपादित करण्यात आले आहे,त्यातुन हि चर योजना कार्यान्वित केलेली आहे.मात्र सध्या या चराच्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे या योजनेच्या आय.पी.बाजुने ३३फुट रस्ता बंद आहे.तो खुला करुन देण्यासाठी सदर शेतकऱ्याने ४मे रोजी तसा अर्ज जलनिःसारण कार्यालयात देऊन त्यावर अद्याप पुढील कारवाई झालेली नसुन ,याबाबत रस्ता मोकळा करणेकामी पोलिस संरक्षण शेतकऱ्यानेच घ्यावे अशे सांगुन कार्यालय जबाबदारी झटकत असल्याचे रणजीत जगताप यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

चर योजनेसाठी माझी २६गुंठे जमीन संपादित केली असुन,मला दळणवळणासाठी रस्ता नसुन,जलनिःसारण कार्यालयाने मला रस्ता मोकळा करुन द्यावा.त्यासाठी संरक्षणाची गरज भासल्यास त्यांनीच बघावे.फक्त मला दैनंदिन वापरासाठी रस्ता मोकळा करुन देण्यात यावा.
---------------
रणजित जगताप तक्रारदार शेतकरी,
दहेगांव(बो)ता.कोपरगाव

                     

  जगतापांना अगदी पहिल्या दिवसापासून माझ्याकडून पूर्ण सहकार्य दिलेले आहे .त्यांना त्यांच्या क्षेत्रांमधून बाहेर पडण्यासाठी रस्ता असणे याबाबत मी पूर्णपणे सकारात्मक आहे.ज्यांनी त्यांच्या रस्ता वहिवाटी साठी साठी अडचण निर्माण केलेली आहे, त्यांना वेळोवेळी कायदेशीर रित्या नोटिसा देखील दिलेल्या आहेत. रस्त्यावरील झाडे तोडण्याची रितसर वन विभागाला कळवून पंचनामा करुन रस्ता मोकळा करुन दिला जाईल.या शासकीय कामी कुणी हरकत दाखवली तरच आम्ही संरक्षण घेऊ त्यात तक्रारदार शेतकऱ्याचा संबंध नाही. त्यामुळे जगताप यांनी या कार्यालयाची जी बदनामी केलेली आहे ती बाब अतिशय खेदजनक आहे.
--------
राजेंद्र पावटेकर(उप विभागिय अभियंता)
गोदावरी कालवे जलनिःसारण कोपरगाव


अतिक्रमणे मोकळे करण्याची त्यासाठी यंत्रणा राबविण्याची जबाबदारी शेतकऱ्याची नसुन गोदावरी कालवे जलनिःसारण कार्यालयाची आहे.एकतर कार्यालयात कर्मचाऱ्यांची वानवा असुन,कार्यालयात बहुतांशी वेळेस  शिपाई आणि कारकुन सोडुन कुणी दिसत नाही.कर्मचाऱ्यांचा कार्यालयीन कामांत शेतकऱ्यांना दिरंगाईचा सामना करावा लागत आहे.