Breaking News

कोपरगाव तालुक्यात आज १६ रुग्ण कोरोना मुक्त !

कोपरगाव तालुक्यात आज १६ रुग्ण कोरोना मुक्त !
करंजी प्रतिनिधी-
     आज ५ ऑगस्ट दुपारपर्यंत कोपरगाव तालुक्यातील कोरोना रुग्णाच्या ३० रुग्णाची भर पडली असली तरी आज  तालुक्यातील एकूण १६ कोरोना रुग्ण पूर्णपणे उपचार घेऊन बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले तसेच आज रोजी कोपरगाव शहरातील स्वामी समर्थ नगर येथील नगर  सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतांना एका ६० वर्षीय   महिलेचा मृत्यू झाला असून आज पर्यंत तालुक्यातील एकूण मृत्यू पावलेल्या रुग्णाची संख्या ३ झाली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
   कोपरगाव केअर सेंटर मध्ये ऍडमिट असलेल्या रुग्णांवर कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर, कोपरगाव तालुका विशेष वैद्यकीय कोविड अधिकारी डॉ वैशाली बडदे, कोपरगाव तालुका ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष विधाते व त्यांचा संपूर्ण आरोग्य विभाग सर्व रुग्णाची योग्य रित्या काळजी घेत असून प्रत्येक रुग्णांवर बारकाईने लक्ष देऊन आहे.
     तसेच आज दुपार अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या २१२ झाली असून त्यात  ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १२४ झाली  असल्याने कोपरगाव तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे तरी देखील नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे जेणेकरून तालुक्यातील वाढत चाललेली कोरोनाची साखळी आपल्याला तोडण्यात यश मिळू शकते.