Breaking News

वडाळा बहिरोबा येथे धाडसी दरोडा, चोरट्यांच्या झटापटीत युवक गंभीर जखमी !

वडाळा बहिरोबा येथे धाडसी दरोडा, चोरट्यांच्या झटापटीत युवक गंभीर जखमी !           
 नेवासा तालुका प्रतिनिधी
   अहमदनगर - औरंगाबाद महामार्गावरील वडाळा बहिरोबा येथील रस्त्याच्या कडेला हकेच्या अंतरावर असलेल्या बापूसाहेब केशव मोटे यांच्या वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकून १ लाख २८ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिनेसह १ लाख १७ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ४५ हजार रुपयाचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी (दि.९) रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली.यावेळी चोरट्यांच्या झटापटीत किशोर बापूसाहेब मोटे या युवकाला अज्ञात चोरट्यांनी कटावणी सारख्या हत्याराने डोक्यावर गंभीर हल्ला चढवल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी झाला असून जखमीवर वडाळा (बहिरोबा) येथील एफ.जे.एफ.एम. मिशन हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. 
     अतिशय गजबजलेल्या वस्तीवर चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकल्यामुळे वडाळा (बहिरोबा ) येथे चोरट्यांच्या दहशतीमुळे प्रचंड घाबरट पसरली आहे.
   वडाळा (बहिरोबा) येथील बापूसाहेब केशव मोटे यांच्या वस्तीवर दरोडा पडल्याची खबर पोलिसांना मिळताच शनिशिंगणापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक वंसत भोये घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहीती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मिळताच अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.दिपाली काळे - (कांबळे) शेवगांव उपविभागिय पोलिस अधिकारी मंदार जवळे,स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचे पोलिस निरिक्षक दिलिप पवार यांनी घटनास्थळी तातडीने मध्यराञी भेट देवून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.
    या घटनेची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवत स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांनी गोंडेगांव येथील दोन संशयितांना ताब्यात घेवून गजाआड केले. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून तपासाची चक्रे वेगाने फिरविल्याने जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.
   वडाळा (बहिरोबा) येथील बापूसाहेब केशव मोटे यांचा महामार्गावर हाकेच्या अंतरावर बंगाला असून या बंगल्याचा दरवाजा कटावणीच्या सह्याने तोडून दोन चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश करुन उचका पाचक सुरु केली यावेळी बंगल्यात झोपलेल्या बापूसाहेब मोटे व त्यांच्या पत्नी सौ चंद्रकला मोटे यांच्या खोलीमध्ये उचका पाचक सुरु केली यावेळी हे गाढ झोपेत असल्यामुळे चोरट्यांनी बाहेरुन दरवाजा बंद करत त्यांचा मुलगा व सुन झोपलेल्या खोलीकडे आपला मोर्चा वळविला. त्यांचा दरवाजा आतून बंद असल्यामुळे कटावणीच्या सह्याने दरवाजाचा कडीकोयंडा उचकाटून आत प्रवेश केला यावेळी चोरट्यांनी ओमसह दोन तोळे सोन्याचे लॉकेट, सोन्याच्या दोन अंगड्या,दोन मणिमंगळ सुत्र असा ऐवज हस्तगत करुन शंभर,दोनशे व पाचशे रुपयांच्या नोटा असलेल्या १ लाख १७ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी हस्तगत केला या चोरट्यांच्या झटापटीत किशोर बापूसाहेब मोटे यांनी चोरट्यांशी पंगा घेत प्रतिकार केला असता चोरट्यांनी किशोर यांच्या डोक्यात कटावणीचा जोरदार हल्ला चढविला त्यामध्ये किशोर मोटे हा रक्ताच्या थारोळ्यात जखमी होवून पडल्याने चोरटे बंगल्याच्या मागील दरवाजाने पळ काढून पसार झाले. त्यांचे पाय रक्ताने भरल्यामुळे  चोरट्यांच्या पायाचे ठसे उमटलेले होते. या घटनेनंतर चोरट्यांनी आपला मोर्चा एकनाथ दशरथ मोटे व सुखदेव कोंडीराम साळवे यांच्या वस्तीकडे वळविला या घटनेची खबर शनिशिंगणापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक वसंत भोये यांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेची माहीती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ.दिपाली काळे (कांबळे) शेवगांव उपविभागिय पोलिस अधिकारी मंदार जवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी मध्यराञी भेट देवून श्वान पथकाने चोरट्याचा माग शोधला असता अमरप्रित हॉटेलच्या चारी पर्यंत यावेळी श्वानने माग काढला या प्रकरणी बापूसाहेब केशव मोटे यांनी शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आसून दोन संशयितांना गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक पवार यांनी ताब्यात घेवून गजाआड केले आहे.