Breaking News

पारनेर तालुक्यात आज दुपार पर्यंत सात कोरोना बाधित, एकुण आकरा अहवाल निगेटिव्ह !

पारनेर तालुक्यात आज दुपार पर्यंत सात कोरोना बाधित, एकुण आकरा अहवाल निगेटिव्ह !
पारनेर प्रतिनिधी- 
पारनेर तालुक्यातील शासकीय लॅब च्या अहवालानुसार सात जणांना कोरोना ची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
यामध्ये पारनेर 3 सुपा 2  रायतळे 1 गांजीभोयरे  1  या व्यक्तींचा समावेश आहे
तर सुपा 4 कान्हूर पठार 1 पोखरी 2 टाकळीढोकेश्वर 2 कासारे 1 असे 11 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
पारनेर मधील तीन व्यक्ती बाधित आढळले आहेत ते पारनेर पोलीस स्टेशन मधील कैदी आहेत.
ज्या भागात कोरोना बाधित व्यक्ती सापडली आहे तो 100 मीटर परिसर कंटेनमेंट म्हणून घोषित असे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत