Breaking News

दारू दुकाने उघडण्यास परवानगी मिळते मग धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी का नाही -आ पाचपुते !


दारू दुकाने उघडण्यास परवानगी मिळते मग धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी का नाही -आ पाचपुते
---------
भाजप चे घंटानाद आंदोलन !
----------


श्रीगोंदा प्रतिनिधी :- 
     राज्य सरकारला दारूची दुकाने सुरु करण्याची घाई झाली होती पण धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी का दली जात नाही असा सवाल आमदार बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा येथे आयोजित आंदोलनात केले 
     कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकस आघाडी सरकारने राज्यातील मॉल, मांस, मदिरा पुनश्च हरी ओम च्या नावाखाली सर्व काही चालू केले.मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात हरी ला मात्र बंदिस्त ठेवले आहे.संतभूमी महाराष्ट्रात मद्य मुबलक सुरु आहे. आणि भजन पूजन करणारे  भाविक भक्तांवर गुन्हे दाखल होत आहेत.भाविक भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल, असा सरकारचा कारभार सुरु आहे, सरकारकडून दारूचे दुकाने उघडण्यास परवानगी मिळते, मग धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी का नाही ! असा सवाल या घंटानाद आंदोलनावेळी आमदार बबनराव पाचपुते यांनी केला. 
     आमदार पाचपुते पुढे म्हणाले की,  महाराष्ट्रातील देवस्थाने, धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी सातत्याने होत आहे.केंद्र सरकारनेही ४ जून २०२० रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले आहे.त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरु झालेली आहेत.राज्यातही सामाजिक अंतर पाळून आवश्यक नियम अटी शर्तीसह देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरु करण्याची तसेच भजन, कीर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी भाविक भक्तातून होत आहे.मात्र  पुनश्च हरी ओम म्हणून हरीलाच बंदिस्त करून  सरकार कुंभकर्णी अवस्थेत गेले आहे. 
     या आंदोलनाच्या निमित्ताने सामाजिक अंतर आणि नियमासह राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरु करून भजन, कीर्तन व पूजनास परवानगी मिळावी. या मागणीकडे निद्रिस्त ठाकरे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक अंतर ठेऊन श्रीगोंदा तालुका भाजपाचे वतीने  आमदार बबनराव पाचपुते,जिल्हा चिटणीस सुनीलराव थोरात , भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, उपनगराध्यक्ष अशोकराव खेंडके, महिला अध्यक्षा सौ.सुहासिनी गांधी, दादाराम ढवाण,  भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष रायकर,शहराध्यक्ष संतोष खेतमाळीस,संतोष धोत्रे मेजर ,बापूराव जाधव ,विजय वाकडे , अमोल अनभुले, विशाल राऊत, नमन भंडारी, भगवानराव वाळके, चंद्रकांत खेतमाळीस, राजेंद्र उकांडे  इ.पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत  शनिमंदिर श्रीगोंदा येथील धार्मिक स्थळाजवळ घंटानाद आंदोलन करण्यात आले.