Breaking News

येसगावातील शेतकऱ्यांना अॕप्सचे प्रशिक्षण !

येसगावातील शेतकऱ्यांना अॕप्सचे प्रशिक्षण.
( बाभुळगाव विद्यालयातील विद्यार्थ्यांचा उपक्रम )
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
   महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येवला तालुक्यातील बाभूळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी अभिनव कैलास महाले व गणेश दौलत जाधव यांनी कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत येसगाव ता.कोपरगाव येथील शेतकऱ्यांना शेती विषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. 
    या अभ्यास दौऱ्यात कार्यानुभव उपक्रमांतर्गत प्रगतशील शेतकऱ्यांना आधुनिकतेची कास धरत मोबाईल अॕप्स चे प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देत असुन. कृषी दूत गणेश जाधव व अभिनव महाले  यानीं येसगाव गावातील शेतकऱ्यांना या उपक्रमातून मेघदूत, इफको किसान, प्लानटिक्स, किसान अभिमान, फार्मराईज, मार्केट यार्ड आदिंची सविस्तरपणे माहिती देवून शेतकऱ्यांना आधुनिक दर्जेदार शेतीसाठी आवाहन करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे शेतकऱ्यांतून स्वागत होत असून, शेतकरी देखील मोठ्या कुतूहलाने माहिती जाणून घेत आहेत. 
     शेती क्षेत्रातील अॕप्स सोबतच माती परीक्षण, बीजअंकुरण, जनावरांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण, एकात्मिक तण व्यवस्थापन, बागायती पिकांचे आधुनिक वृक्षारोपण,  पीकातील सूक्ष्म पोषक घटकांचे महत्त्व, पशु लसीकरण, याविषयी मार्गदर्शन केले. 
या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. कुलधर, डॉ. म्हस्के प्रा.नरोटे, प्रा.साळुके प्रा. तायडे प्रा.राठोड प्रा. कोळगे प्रा.बाजड, प्रा.पगारे प्रा. भोर मॅडम प्रा.शेवगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.