Breaking News

आमदार मोनिका राजळे यांच्यासह भाजपाच्या विविध पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल !
आमदार मोनिका राजळे यांच्यासह भाजपाच्या विविध पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल !


पाथर्डी/प्रतिनिधी :
    दुधउत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रदेश भाजपाच्या वतीने राज्यव्यापी दुध एल्गार आंदोलन पुकारण्यात आले होते.याच राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून आमदार राजळे यांच्या नेतृत्वाखाली १ ऑगस्ट माळी बाभूळगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.

      तसेच वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात निष्कर्ष आमदार म्हणुन आंदोलन करण्यात आल्याने वंचितच्या कार्यकर्त्यांवर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.त्याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमदाराला एक न्याय व सर्वसामान्य जनतेला एक न्याय असा दुजाभाव केल्याप्रकरणी पाथर्डी पोलिसांच्या विरोधात उपविभागीय कार्यालय शेवगाव येथे शुक्रवार पासून उपोषण करण्यात आले.

     त्याची दखल घेत कोव्हिड 19 या रोगाच्या विषाणूचा संसर्ग पसरु नये म्हणुन जिल्हाधिकारी यांचे जमावबंदीचा आदेशाचे उल्लंघन करत एकत्र आल्याने आमदार मोनिकाताई राजऴे, माणिक कोंडिबा खेडकर, विष्णुपंत रामनाथ अकोलकर, गोकुऴ विष्णू दौंड,जर्णाधन वांडेकर,प्रवीण राजगुरु व 30 ते 35 कार्यकर्त्यांवर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.