Breaking News

सोमैय्या विद्या विहारचे श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचा १०० टक्के निकाल !

सोमैय्या विद्या विहारचे श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचा  १०० टक्के  निकाल
कोपरगांव / तालुका प्रतिनिधी 
महाराष्ट्र  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल  जाहीर झाला.  तालुक्यातील सोमैय्या विद्याविहारचे श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचा १००% निकाल लागला आहे. विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे घवघवीत यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
        कु. शुभांगी नितीन आंबेकर हिने ९६.४० टक्के  गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. 
कु.वैष्णवी अनिल नरोडे ९४.८० टक्के  चि.प्रसाद लक्ष्मण जोशी ९४.४० टक्के   गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला आहे. विद्यालयातून एकूण १६४ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले  होते. त्यापैकी १४२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तसेच २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व १ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय प्रशासन, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एस.मोहन , सहाय्यकव्यवस्थापक  मधुकर दराडे, अकौंटंट  दिनेश गुप्ता, विश्वस्त सौदागर कुलाल, समन्वयक  अश्विनी शेळके, पालक- शिक्षक संघ, प्राचार्य के एल वाकचौरे, उपप्राचार्य डी व्ही चाफेकर,  शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी अभिनंदन केले