Breaking News

आढळा धरण ओव्हर फ्लो झाले.!

आढळा धरण ओव्हर फ्लो झाले!


अकोले/ प्रतिनिधी :
      अकोले, संगमनेर आणि सिन्नर तालुक्याला वरदान  ठरलेले अकोले तालुक्यातील आढळा धरण आज ओव्हर फ्लो झाले
 तालुक्यातील देवठाण येथील १०६० द.ल.घ.फु क्षमता असलेले आढळा धरण आज रविवारी दुपारी एक वाजता  भरून सांडव्यावरून वाहू लागले.
अकोले,संगमनेर व सिन्नर या तीन तालुक्यातील , देवठाण , विरगाव, हिवरगाव आंबरे , गणोरे ,डोंगरगाव, पिंपळगाव निपाणी, वडगाव लांडगा, जवळे कडलग, धांदरफळ,राजापूर, चिकणी, निमगाव भोजापूर, नळवाडी, कासारवाडी, अशा पंधरा गावातील शेतीसाठी याच धरणाच्या पाण्याचा उपयोग होतो त्यामुळे धरण ओव्हर फ्लो होण्याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागून होते.  अकोले तालुक्यात गेल्या 10 ते 12 दिवसापासून पाऊस सुरू  असल्याने   आढळा खोऱ्यातील पाडोशी, सांगवी धरण   यापूर्वीच भरले होते यामुळे आढळा धरणात पाण्याची आवक वाढली हाती   अखेर आज  आढळा धरण भरल्याने  शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे   
उद्या सोमवारी सकाळी धरणाचे शासकीय जलपूजन होणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंता जी डी हारदे ,आर एम देशमुख, शाखा अभियंता अभिषेक पवार, श्री कवडे  यांनी सांगितले
 अकोले तालुक्याचे  आमदार डॉ किरण लहामटे यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता आढळा धरणाचे जलपुन  होणार  आहे  त्यानंतर सकाळी  9 वाजता सांगवी धरणाचे  तर  सकाळी 10 वाजता   पाडोशी धरणाचे  जलपूजन आमदार लहामटे यांचे हस्ते होणार आहे 
---------